फलटणच्या दुय्यम निबंधक दोनमध्येच नोंदणीचा अट्टाहास.

फलटणच्या दुय्यम निबंधक दोनमध्येच नोंदणीचा अट्टाहास.

फलटण प्रतिनिधी: जुबेरभाई कोतवाल. 

फलटण तहसील कार्यालयाच्या मागे असलेले कार्यालय क्रमांक १ जवळपास ओस पडलेले असताना, बांधकाम विभागाच्या शेजारी दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कार्यालय क्रमांक २ मध्येच दस्त नोंदणी करण्याचा अट्टाहास प्रशासनाकडून धरला जात आहे. त्यामुळे त्या परिसरात मोठी गर्दी होत आहे.२ मध्ये कार्यालय क्रमांक दिवसेंदिवस प्रचंड गर्दी होत आहे. नागरिकांना येथे तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. पारा चाळीशीच्या उंबरठ्यावर पोहोचलेला असताना याठिकाणी पिण्याच्या पाण्याची साधी व्यवस्था नाही, स्वच्छतागृहांची सोय नाही, तर बसण्यासाठी पुरेशी जागाही उपलब्ध नाही. परिणामी, नोंदणीसाठी आलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील लोकांना जनावरांसारखी वागणूक मिळत असल्याची भावना व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, कार्यालय क्रमांक १ मध्ये प्रशस्त जागा उपलब्ध असतानाही बहुसंख्य दस्त कार्यालय क्रमांक २ मध्येच का नोंदवले जात आहेत, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.