उपविभागीय कार्यालय कोरेगाव येथे पाणी टंचाई वर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विशेष आढावा बैठक संपन्न.

उपविभागीय कार्यालय कोरेगाव येथे पाणी टंचाई वर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विशेष आढावा बैठक संपन्न.

विशेष प्रतिनिधी, अकबर भालदार.

आज उपविभागीय कार्यालय, कोरेगांव येथे तालुक्यातील पाणी टंचाई वर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी विशेष आढावा बैठक घेतली. यावेळी खासदार श्री. नितीनकाका पाटील यांच्यासह सभापती रुपालीताई गुरव, तहसीलदार संगमेश्वर कोंडे , बीडीओ सुप्रिया चव्हाण, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. प्रत्येक गावातील पाणीटंचाईची भीषणता जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला, त्यांच्या शेतीला त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे हीच आमची प्राथमिकता आहे. धोम धरणातून येणारे पाणी तसेच वसना - वांगना प्रकल्प असो किंवा जिहे - कठापूरचे पाणी असो, नियमानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे जेवढे पाणी मिळणे अपेक्षित आहे, त्यामध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे. या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी आम्ही येत्या २-४ दिवसांतच एक महत्त्वाची बैठक आयोजित करत आहोत. या बैठकीनंतर आमची पुढील दिशा आणि ठोस भूमिका आम्ही थेट शेतकऱ्यांसमोर मांडणार आहोत. जनतेच्या हक्काच्या पाण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरूच राहील. अशी ग्वाही आमदार शशिकांतजी शिंदे यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.