लाल मातीचा रांगडा खेळ कुस्ती शौकिनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
विशेष प्रतिनिधी, अकबर भालदार.
लाल मातीच्या रांगडा खेळात हिंदकेसरीच्या आखाड्यात महेंद्र ठरला बाहुबली हिंदकेसरीच्या मैदानात रात्री साडे अकरानंतर झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बलाढ्य महेंद्र गायकवाड हिंदकेसरीच्या आखाड्यात बाहुबली ठरला. पराभव पत्करावा लागल्याने विजयचे हिंदकेसरी पदाचे स्वप्न अपुरे राहिले.या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.रात्री उशिरा झालेल्या रंगतदार लढतीत दिल्लीच्या आक्रमक अनिरुद्ध पुढे उत्तर प्रदेशच्या गोपालने दुखापतीमुळे माघार घेतल्याने अनिरुद्धला विजयी घोषित केले.आंतराष्ट्रीय विजेता रविराज आणि महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ हे महाराष्ट्रातील मल्ल समोरासमोर ठाकले होते पहिल्या फेरीत आक्रमक पृथ्वीराजला रविचा भक्कम बचाव भेदता आला नाही. नकारात्मक कुस्ती बद्दल एक गुणांची बढत घेऊन मोहोळने दबाव वाढवला होता. दुसऱ्या फेरीतही निष्क्रियतेचा एक गुण पृथ्वीराजला मिळाल्याने दोन गुणांची कमाई करून प्रतिष्ठेची लढत दोन विरुद्ध शुन्य गुणांनी जिंकली.रेल्वेच्या रजतला हरियाणाच्या बिपिनने दमवले पहिल्या फेरीत रजत पिछाडीवर राहिला. दुसऱ्या फेरीत रजतने आक्रमक होऊन गुण मिळवून भक्कम आघाडी घेतली निर्णायक लढत 12 विरुद्ध 6 गुणांनी खिशात टाकली. महेंद्र गायकवाड आणि विजय चौधरी यांच्या लढतीत विजयने निष्क्रियतेच्या एका गुणासह पहिल्या फेरीत आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत आक्रमक महेंद्रने विजयला वरचढ होऊ दिले नाही. हप्ते डावाची पकड करीत बरोबरी साधली. निष्क्रियतेचा एक गुण महेंद्रला मिळाल्याने त्याची आघाडी दोन झाली होती. पिछाडीवर राहिल्याने गुण मिळवण्यासाठी लढणाऱ्या विजयचे डाव असफल झाले. महेंद्रने एकेरी पट काढून आणखी गुणांची कमाई केली शेवटच्या मिनिटात थकलेल्या चौधरीवर पुन्हा दोन गुण मिळवून निर्णायक आघाडी घेऊन हिंदकेसरीच्या मैदानातील विजयची घौडदौड रोखली. विजयानंतर महेंद्रने विजयच्या पायाला हात लावून नमस्कार करीत विनम्रतेचे दर्शन घडवले.तसेच विजयचे प्रशिक्षक हिंदकेसरी रोहित पटेल यांना सुद्धा नमस्कार केला.विजयने देखील अलिंगन देऊन महेंद्रचे कौतुक केले.तसेच गोविंद पवार यांना अभिवादन करून आपल्यातील नम्रता दाखवून दिली. या संपूर्ण प्रसंगी अनेकजण भावूक झाले होते.दोन्ही बलाढ्य खेळाडूंच्या खिलाडू वृत्तीचे कुस्ती शौकीनांनी मात्र कौतुक केले.
52 व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत शनिवारी सायंकाळच्या सत्रातील लढतीचा महासंग्राम चांगलाच रंगला हिंदकेसरी किताबाचे प्रबळ दावेदार विजय चौधरी, पृथ्वीराज मोहोळ, महेंद्र गायकवाड,विक्रम भोसले यांनी आपली आगेकूच कायम ठेवली. तर महिला गटात प्रगती गायकवाड पूजा पाटील, अनुष्का जाधव यांनी फायनल मध्ये प्रवेश निश्चित केला. सायंकाळच्या सत्रात लढतीचा महासंग्रामात अनेकांनी आपल्या नेत्रदीपक कामगिरीने उपस्थितांची मने जिंकली खवासपूरच्या विक्रम भोसले यांने लढतीत धोबीपछाड, छडीटांग,ढाक, दुहेरी पट,खेमी आणि साल्तो डावाचे प्रदर्शन करीत वाहवा मिळवली तिसऱ्या फेरीत किताबाच्या लढतीत दिल्लीचा आंतरराष्ट्रीय मल्ल अनिरुद्ध आणि जम्मू कश्मीरचा बहादुरखान यांच्यातील लढतीत अनिरुद्ध तांत्रिक गुणाने विजयी झाला. यु.पीच्या गोपालने उत्तर प्रदेशच्याच किशन कुमारला नमविले. आंतरराष्ट्रीय मल्ल रविराज चव्हाण आणि रोहित मोर यांच्यातील चुरशीच्या लढतीने उपस्थितांची वाहवा मिळवली.पहिल्या फेरीत रविने आघाडी घेऊन दबाव वाढवला.दुसऱ्या फेरीत देखील बढत कायम ठेवून ही लढत खिशात टाकली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि हिमांशू दिल्ली यांच्यातील लढतीत पृथ्वीराजने सलामीला ताबा घेऊन भारंदाज डावावर गुण मिळवला. बलदंड ताकदीच्या पृथ्वीराजपुढे हिमांशूचा टिकाव लागला नाही. अटीतटीचा मुकाबला मोहोळने तांत्रिक गुणाने जिंकली. रजत राहुल विरुद्ध लक्ष सेहरावत यांच्यातील लढतीत रजत राहुलने सर्वच आघाड्यांवर वर्चस्व राखले लक्षला गुणांचे उघडता आले नाही. डार्क हाॅर्स जय पाटीलने बिपिन कुमारला झुंजविले .जयने बलाढ्य बिपीनला बँकथ्रो डाव टाकत पिछाडी भरून काढली.मात्र दुसऱ्या फेरीत बिपीनने जयला चितपट करून बाजी मारली. अनुभवी विजय चौधरी आणि सांगलीचा बिलवा मल्ल यांच्यातील लढतीत विजयने विक्रमचे आक्रमण मोडीत काढून तांत्रिक गुणाने विजय मिळवून किताबाच्या दिशेने घौडदौड चालू ठेवली. मुलायम यादव आणि महेंद्र गायकवाड यांच्या लढतीत महेंद्रला पुढे चाल मिळाली.
महिलांच्या 52 किलो वजनगटात सेमीफायनल मध्ये पूजा पाटीलने रिया ठाकूरला पराभवाची धूळ चारली. महाराष्ट्रातील अनुष्का जाधव पुढे हरियाणाच्या मोनूची डाळ शिजली नाही.आशियाई पदक विजेती प्रगती गायकवाडने सेमी फायनलची जागा पक्की केली.
*महिला गटात अमृता, काजल, खुशी,मंजू किताबाच्या दिशेने...*
महिला हिंदकेसरी गटात हरियाणाच्या काजलने कर्नाटकच्या मनीषाला चितपट केले.हरियानाच्या मंजू संधू आणि सांगलीची अपेक्षा पाटील यांच्यात झालेल्या किताबाच्या लढतीत अपेक्षाची झुंज फक्त एक गुणांनी अपयशी ठरली. दिल्लीची खुशी गुजरातच्या मिनाला भारी ठरली. मध्य प्रदेशची भावीला कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय मल्ल अमृता पुजारीने धोकादायक स्थितीत नेहून आसमान दाखवले.विजयी मल्लांनी सेमी फायनल मध्ये आपली जागा निश्चित केली.
*उन्हाच्या तडाख्यात मल्लांची दमछाक*
हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेतील सकाळच्या सत्रात उन्हाच्या झळा आखाड्यातील मल्लांपर्यंत पोहचल्या. लाल मातीत त्वेषाने लढताना पैलवानांच्या घामाचा चिखल झाला होता.घामामुळे डावपेच करताना हात निसटून जात होते. चुरशीच्या लढतीत विजयासाठी झुंजताना मल्लांची दमछाकही झाली.उन्हाचा तडाखा असला तरी किताब जिंकण्याची महत्त्वाकांक्षेमुळे मल्लांचा उत्साह दिसून येत होता.चौधरीची कुस्तीत तपश्चर्या
खुल्या गटात घाम गाळत तब्बल सोळा वर्षे अखंड आखाड्यात लढणारे ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी हिंदकेसरी किताबासाठी आखाड्यात उतरले आहेत. 2009 पासून महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आखाड्यात सातत्याने दमदार कामगिरी करणाऱ्या चौधरी यांनी 2014, 2015 आणि 2016 या सलग वर्षांत महाराष्ट्र केसरी किताब पटकावत ट्रिपल महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवला होता.नोकरीची जबाबदारी सांभाळताना सरावात तडजोड केली नाही. सरावातील सातत्य, आहार आणि नियमित व्यायामाच्या जोरावर त्याने स्वतःचा फिटनेस ठेवला आहे.
Comments
Post a Comment