प्रतिकूल परिस्थितीवर मात करत .सौ. सायली विशाल शिंदे यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड.
फलटण प्रतिनिधी:- जुबेरभाई कोतवाल.
ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेल्या धुळदेव गावची सुकन्या सौ. सायली विशाल शिंदे यांची नुकतीच Maharashtra Police मध्ये रत्नागिरी येथे निवड झाल्याचे जाहीर झाले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कै. ज्योतीराम माणिकराव शिंदे यांचे आशीर्वाद तसेच धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते मा.श्री विशाल ज्योतीराम शिंदे यांच्या भक्कम पाठबळामुळे संघर्ष, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे समाजाच्या सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा अक्षरशः वर्षाव होत असल्याचे दिसून येत आहे.त्यांच्या या निवडीबद्दल फलटण पंचायत समितीचे सदस्य तथा अध्यक्ष मा.श्री सचिन अभंग, धुळदेव गावचे माजी सरपंच चंद्रकांत जाधव, मा.श्री सुभाषराव शिंदे, विडणीचे माजी सरपंच शरदराव कोल्हे, धुळदेव विकास सोसायटीचे माजी चेअरमन बापूराव नाळे, ग्रामपंचायत सदस्य महामुनी, सामाजिक कार्यकर्ते अनिकेत पवार, रवीभाऊ मदने, सौरभ आदलिंगे तसेच ग्रामस्थ पदाधिकारी व महिला भगिनी यांनी सौ. सायली शिंदे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सौ. सायली शिंदे यांचे हे यश निश्चितच धुळदेव गावासाठी अभिमानास्पद असून ग्रामीण भागातील युवक-युवतींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
Comments
Post a Comment