दैनिक सकाळ चे पत्रकार प्रा. अमोल पवार यांना महालक्ष्मी आधार फाउंडेशनचा राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार जाहीर.

दैनिक सकाळ चे पत्रकार प्रा. अमोल पवार यांना महालक्ष्मी आधार फाउंडेशनचा राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार जाहीर.

फलटण तालुका प्रतिनिधी:- जुबेरभाई कोतवाल.

दैनिक सकाळ चे राजाळे प्रतिनिधी पत्रकार प्रा. अमोल विठ्ठल पवार (फलटण) यांना महालक्ष्मी आधार फाउंडेशन आयोजित भारतीय संविधान जनजागृती अभियानांतर्गत "राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार 2026" जाहीर झाला आहे.पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य तसेच सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांना हा सन्मान जाहीर करण्यात आल्याची माहिती महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. प्रतिभा शेलार यांनी दिली.प्रा. अमोल पवार यांनी पत्रकारितेसोबत समाजप्रबोधन, जनजागृती आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच पत्रकारिता क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.