पावसाच्या पहिल्याच बॉलवर महावितरणाची विकेट.

पावसाच्या पहिल्याच बॉलवर महावितरणाची विकेट.

 फलटण तालुका रात्रीच्या अंधारात; महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा उघड!

फलटण प्रतिनिधी:जुबेर कोतवाल.

फलटण तालुक्यात सायंकाळच्या वेळी पावसाने पहिलीच जोरदार हजेरी लावताच महावितरणची यंत्रणा पुन्हा एकदा कोलमडली असून अनेक भागातील वीजपुरवठा अचानक खंडित झाला आहे. पहिल्याच पावसात लाईट गुल झाल्याने नागरिक संतप्त झाले आहे 
एकतर मे महिना त्यातच दिवसा ४२ अंश पेक्षा जास्त तापमान त्यातच महावितरणच्या निष्काळजी आणि नियोजनशून्य कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.दरवर्षी पावसाळ्यापूर्वी देखभाल आणि दुरुस्तीची मोठमोठी आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्षात पहिल्याच पावसातच व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र फलटण तालुक्यात पाहायला मिळत आहे. कोणतीही ठोस पूर्वतयारी न केल्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे घरगुती कामे विस्कळीत झाली असून उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांचे विशेष हाल होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.“महावितरण झोपेत आहे का?” असा संतप्त सवाल आता फलटणकरांकडून उपस्थित केला जात आहे.पहिलाच पाऊस आणि संपूर्ण यंत्रणा ढेपाळली; मग पुढचा पावसाळा कसा सांभाळणार?महावितरणच्या भोंगळ आणि बेजबाबदार कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.