रोपवाटिका व्यवस्थापन" या विषयावर रावडी बु. येथे व्याख्यान आयोजित.

रोपवाटिका व्यवस्थापन" या विषयावर रावडी बु. येथे व्याख्यान आयोजित.

साखरवाडी प्रतिनिधी, ताजुदिन आत्तार.

रावडी बु, ता. फलटण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित कृषी महाविद्यालय फलटण येथील चतुर्थ वर्षातील  कृषीदूत ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ अंतर्गत रावडी बु. येथे "रोपवाटिका व्यवस्थापन" आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 
            
             रोपवाटिका व्यवस्थापन आधारित व्याख्यान देण्यासाठी  श्री समर्थ नर्सरी,  सुखेड, ता. खंडाळा, जि. सातारा चे सर्वेसर्वा डॉ.बापूराव चोपडे सर, कृषी सहाय्यक मा. आदेश करे साहेब, सरपंच दिलीप ताकवले, चेअरमन, सदस्य व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. चोपडे सरांनी सुरुवातीला रोपवाटिकेसाठी निवडण्याची योग्य जागा, पाण्याचे व्यवस्थापन, रोपांचे महत्त्व, खात्रीशीर रोपे तयार करणे व रोपवाटिकेचे व्यवस्थापन या विषयी माहिती दिली.  त्यानंतर फळबागांचे महत्त्व, जमिनीची निवड, फळांवरील रोग व किड व्यवस्थापन, फळांच्या जाती, झाडांमधील अंतर व फळ परीपक्व झाल्यानंतर त्यासाठी मार्केट, व्यापारी व त्यातून निर्माण होणारे चलन, रासायनिक खतांचे होणारे दुष्परिणाम याबद्दल चोपडे सरांनी माहिती दिली. रोपवाटिका एक चांगला व्यवसाय व त्यामधून उत्पन्नात होणारी वाढ यांबद्दल सविस्तर माहिती सांगितली. तसेच कृषी सहाय्यक मा. आदेश करी सर यांनी देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व विविध योजनांची माहिती दिली. 
             "रोपवाटिका व्यवस्थापन" या कार्यक्रमासाठी सर्व  शेतकरी व कृषीदूत मुले उत्साहात उपस्थित होते.  शेतकऱ्यांनी आपले प्रश्न विचारले व त्यावर  त्यांना समाधानी उत्तरे मिळाली. 
       कृषीदूत जगताप प्रजोत, कदम रोहन, गौंड अनिकेत, गरगडे प्रणव, गोलांडे तुषार, गुरव ओंकार, शेंडगे सार्थक यांनी हा कार्यक्रम राबविला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ यू डी चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे, व प्रा. नितीशा पंडित, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे यांचे विद्यार्थिनींना मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.