खामगांव येथील कृषीदूतांकडून कीटकनाशक फवारणीवर प्रात्यक्षिक.

खामगांव येथील कृषीदूतांकडून कीटकनाशक फवारणीवर प्रात्यक्षिक.

सोनवडी प्रतिनिधी, दिलावर शेख.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदूतांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२०२५ कार्यक्रमाअंतर्गत कीटकनाशक फवारणीवर प्रात्यक्षिक दिले. कृषीदूत ठोंबरे सौरभ, धायगुडे प्रणव, वडणे अथर्व, सकट उत्कर्ष, तूपसौंदर ओंकार, थोरात चरण, फरांदे संकेत आणि पिसाळ रवीकुमार यांनी या कार्यक्रमाअंतर्गत खामगांव, तालुका फलटण येथील ज्वारी पिकावरील कीड नियंत्रणासंबंधित कीटकनाशक फवारणी कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले. फवारणी नंतर शेतकर्‍यांना आवश्यक काळजी घेण्याची सविस्तर माहिती दिली.कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वय प्रा. नीलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित, प्रा. पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.