रावडी बु. येथे शेती उत्पादनाच्या विपणनासाठी ॲप्स बद्दल कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषि दूतांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन.

रावडी बु. येथे शेती उत्पादनाच्या विपणनासाठी ॲप्स बद्दल कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषि दूतांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन.

सोनवडी प्रतिनिधी, दिलावर शेख.

फलटण तालुक्यातील रावडी बु.येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदूतांनी ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमांतर्गत कृषीदूतांनी शेतकऱ्यांना शेतमाल खरेदी-विक्रीबद्दलच्या आधुनिक तंत्रज्ञानची ओळख करून दिली.शेतकऱ्यांना पिकवलेला शेतीमाल  विक्रीची कला आणि वेळ नसल्याने दर्जेदार शेतीमाल असतानाही शेतकऱ्यांना अपेक्षित फायदा होत नाही. ही समस्या दूर करण्यासाठी शेतमाल विक्रीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज भासते. त्यासाठी ॲप्स उपलब्ध आहेत. शेतमाल विक्री ॲपद्वारे शेतकरी आपला शेतमाल मोबाईलद्वारेच विक्री करू शकतात. विविध बाजारपेठांच्या बाजारभावाची माहिती, हवामान अंदाज, बियाणे याबद्दल सहजरित्या माहिती मिळवू शकतात. कृषीदूतांनी शेतकऱ्यांना याबद्दल मार्गदर्शन केले. यासंबंधित ॲप्सचे महत्त्व सांगितले.
ऍग्रो स्टार, ॲग्री सेंट्रल, भारत ॲग्री, एम एस ए एम बी व इफको किसन हे ॲप्स डाऊनलोड करून ते कसे वापरतात याचे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी शेतकरी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.यासाठी कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत जगताप प्रजोत, कदम रोहन, गौंड अनिकेत, गरगडे प्रणव, गोलांडे तुषार, गुरव ओंकार, सार्थक शेंडगे यांनी हा उपक्रम पार पडला.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.