केळी व्यवस्थापन" या विषयावर खामगांव येथे व्याख्यान आयोजित.
फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.
खामगांव, ता. फलटण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित कृषी महाविद्यालय फलटण येथील चतुर्थ वर्षातील कृषीदूत ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ अंतर्गत खामगांव येथे "केळी व्यवस्थापन" आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.केळी व्यवस्थापन आधारित व्याख्यान देण्यासाठी माजी कृषी परिवेशक तय्यब सल्लाउद्दिन मुजावर सर, सरपंच अर्चना जगताप, सदस्य व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. मुजावर सरांनी सुरुवातीला केळी लागवडीसाठी निवडण्याची योग्य जागा, पाण्याचे व्यवस्थापन, केळीची महत्त्वपूर्ण जात, खात्रीशीर केळी उत्पादन व त्याचे व्यवस्थापन याबद्दल माहिती दिली. त्यानंतर फळबागांचे महत्त्व, जमिनीची निवड, केळीवरील रोग व किड व्यवस्थापन, केळीच्या जाती, झाडांमधील अंतर व फळ पिकल्यानंतर त्यासाठी मार्केट, व्यापारी व त्यातून मिळणारे उत्पन्न याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच रासायनिक खतांचे होणारे दुष्परिणाम यावर चर्चा झाली. केळी लागवड हा एक फायदेशीर व्यवसाय असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
"केळी व्यवस्थापन" या कार्यक्रमासाठी शेतकरी व कृषीदूत मुले उत्साहात उपस्थित होती. शेतकऱ्यांनी आपले प्रश्न विचारले व त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली.कृषीदूत ठोंबरे सौरभ, धायगुडे प्रणव, वडणे अथर्व, सकट उत्कर्ष, तूपसौंदर ओंकार, थोरात चरण, फरांदे संकेत आणि पिसाळ रवीकुमार यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे, प्रा. नितीशा पंडित व कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
Comments
Post a Comment