मुरूम येथे शेतकरी दिवस उत्साहात साजरा.
फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.
फलटण दि.२३/१२/२०२४
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिदुतांनी मुरूम येथे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मुरूम गावामध्ये शेतकरी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आरिफा शेख (कृषी सहाय्यक साखरवाडी ता.फलटण )यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व विविध कृषीविषयक योजनांची शेतकऱ्यांना माहिती दिली व सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच मुरूम गावचे उपसरपंच संतोष बोंद्रे यांच्या सहकार्याने मुरूम गावातील सर्व ग्रामस्थ, महिला व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे, कार्यक्रम अधिकारी नीतिषा पंडित, पीक रोगतज्ञ प्रा. पी. व्ही. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत खालील पटेल , अनिकेत कुंभार, अनिल भोंग , सिद्धांत भोसले, राहुल भोंग , विश्वजीत भोसले ,आराज राठोड व तेजस गाढवे यांनी हा कार्यक्रम पार पडला.
Comments
Post a Comment