डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या खटाव तालुकाध्यक्षपदी डॉ. विनोद खाडे,तर उपाध्यक्षपदी राजीव पिसाळ यांची बिनविरोध निवड..

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या खटाव तालुकाध्यक्षपदी डॉ. विनोद खाडे,तर उपाध्यक्षपदी राजीव पिसाळ यांची बिनविरोध निवड..

पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या खटाव तालुकाध्यक्षपदी डॉ. विनोद खाडे तर उपाध्यक्षपदी राजीव पिसाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
धावपळीच्या जीवनात लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तालुक्यातील पत्रकार बांधवांनी  एकजूट होणे आवश्यक असल्याने डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना खटाव तालुका स्थापना करण्यात आली आहे. 
सन २०२५ सालासाठी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेतील नूतन कार्यकारिणी निवडीची बैठक लोकराष्ट्र न्यूज चॅनेलचे वडूज येथीलऑफिसमध्ये  पार पडली.यावेळी नूतन कार्यकारिणीमध्ये तालुकाध्यक्ष डॉ.विनोद खाडे,कार्याध्यक्ष-श्री.विजय जगदाळे,उपाध्यक्ष-श्री राजीव पिसाळ,सचिव-श्री. जे. के काळे, सहसचिव- सौ मिलिंदा पवार, खजिनदार-श्री महेश यादव,सहखजिनदार-श्री दत्तात्रय फाळके,
संघटक- प्रा.अजय शेटे, प्रसिद्धी प्रमुख- श्री लालासाहेब माने- पाटील,संपर्कप्रमुख -श्री सचिन पवार,मार्गदर्शक-श्री महेश तांबवेकर,सदस्य श्री.पंकज कदम, सदस्य श्री.संदीप कुदळे,सदस्य अकबर भालदार,सदस्य नितीन घोरपडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी डॉ विनोद खाडे, मिलींदा पवार, राजीव पिसाळ, जे. के. काळे आदीनी आपली मनोगते व्यक्त केली. 
तरी या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या खटाव तालुका नूतन कार्यकारिणीस संघटनेचे राज्याध्यक्ष राजा माने, राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत, राज्य संघटक तेजस राऊत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले, साप्ताहिक संघटनेचे राज्याध्यक्ष संजय कदम, राज्य सहसमन्वयक गणेश बोतालजी, राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन भिलारे,डिजिटल मीडिया संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे,जिल्हा संघटक मिलिंद लोहार यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.