राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त पाडेगाव फार्म येथे कृषी दुतांकडून वृक्षारोपण.
फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.
फलटण ता. 23
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय फलटण येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थी हे पाडेगाव फार्म तालुका फलटण या गावात ग्रामीण जागरूकता व कृषी कार्यानुभव या कार्यक्रमासाठी गावात आलेले आहेत.
आज दिनांक 23 राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषी दुतांनी न्यू इंग्लिश स्कूल पाडेगाव फार्म या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तरी या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री अहीवळे सर, शिक्षक फडतरे सर व इतर सहकारी उपस्थित होते. यावेळी कृषी विद्यालय फलटणच्या कृषी दुतांनी विद्यार्थ्यांना शेतीचे व शेतकऱ्यांचे महत्त्व समजून सांगितले व वृक्षारोपण ही कशी काळाची गरज आहे यावरती त्यांना मार्गदर्शन केले. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम, समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम व प्रोफेसर धायगुडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत आर्यन जगताप, प्रतीक चौधरी, प्रज्वल यादव ,अमित फाळके ,विराज तोडकर ,सुजित म्हेत्रे, निखील गोवेकर,यांनी हा कार्यक्रम पार पाडला.
Comments
Post a Comment