पाडेगाव येथे शेतकरी दिनानिमित्त कृषीदुतांनी काढली वृक्षदिंडी.

पाडेगाव येथे शेतकरी दिनानिमित्त कृषीदुतांनी काढली वृक्षदिंडी.

सोनवडी प्रतिनिधी, नासीर शेख.

खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदूतांनी ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमांतर्गत कृषीदूतांनी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला. संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय शेतकरी दीन म्हणून 23 डिसेंबर साजरा केला जातो या कार्यक्रमाचे औचित्य साधून पाडेगाव त येथे वृक्ष दिंडी आयोजित केली होती.या कार्यक्रमा अंतर्गत जि. प. प्राथमिक शाळा, पाडेगाव येथील मुख्याध्यापक श्री रविंद्र गायकवाड सर यांच्या मार्गद्शनाखाली वृक्षारोपण करून वृक्षदिंडी काढण्यात आली त्यावेळीं दिंडी मधे विद्यार्थी,  विद्यार्थिनी महाराष्ट्रीयन शेतकरी वेशभूषा व फेटे परिधान करून दिंडीच्या स्वरूपामध्ये रोपट्यांची  मिरवणूक काढून शोभायात्रा काढली या मधे वृक्ष लावा घरोघरी, समृद्धी येई तुमच्या दारी, झाडे लावा घरोघरी, निरोगी राही परिसर, एक झाड एक मुल , वृक्ष लावून करा तिचे रक्षण यांसह विविध घोषणा, प्रतिज्ञा करण्यात आली . वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धनाबाबत जनजागृती करून मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच,उपसरपंच,सदस्य,ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू डी चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी- प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम, समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत इंगोले धनंजय,केसकर राहुल, काटकर सौरभ, कांबळे रोहन, गोडसे आदित्य, धुमाळ श्रीजीत, रनवरे शिवतेज , सार्थक यांनी हा कार्यक्रम पार पडला.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.