मुरूम गहू बीज प्रक्रिया विषयावर प्रात्यक्षिक.

मुरूम गहू बीज प्रक्रिया विषयावर प्रात्यक्षिक.

फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.

फलटण दि.१२/१२/२०२४
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिदुतांनी मुरूम येथे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पिकांवरील वाढत्या  रोगांचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी तसेच पिकांची उगवण क्षमता वाढविण्यासाठी   बीजप्रक्रियांबाबत प्रात्यक्षिकाद्वारे  माहिती दिली.या प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना  गहू उत्पादन वाढवण्यासाठी बीज - प्रक्रिया कशी करावी, याची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात बीजप्रक्रियेचे विविध फायदे शेतकऱ्यांना पटवून देण्यात आले. यावेळी प्रगतशील शेतकरी संजय बोंद्रे , आकाश गायकवाड, मांढरे , धीरज कणसे व शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे, कार्यक्रम अधिकारी नीतिषा पंडित, पीक रोगतज्ञ प्रा. पी. व्ही. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत  खालील पटेल , अनिकेत कुंभार, अनिल  भोंग , सिद्धांत भोसले, राहुल भोंग , विश्वजीत भोसले ,आराज राठोड  व तेजस गाढवे यांनी हे प्रात्यक्षिक पार पाडले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.