खामगावयेथे कृषीदुतांकडून गांडूळ खत निर्मितीचे प्रात्यक्षिक.
फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.
फलटण तालुक्यातील खामगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहरी सलग्र व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृर्षा महाविद्यालय फलटणच्या कृषिदुतांनी शेतकऱ्यांना गांडूळ खत निर्मितीचे प्रात्यक्षिक करून दाखविले.उत्पादन क्षमता वाढवण्यासाटी गांडूळ खत निर्मितीची गरज आहे - गांडूळ खत हे पूर्णपने नैसर्गिक असून सेंद्रिय आहे. त्यामुळे त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत तसेच मृदा भुसभुशीत होते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, पिकांची योग्य वाढ होते, सूक्ष्मजीव व गांडुळांची हालचाल वाढते, जमिनीचे आरोग्य सुधारते, पोषक घटकांची कार्यक्षमता वाढते, औद्योगिक व कृषी कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करता येते असे फायदे पटवून देण्यात आले.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू डी चव्हाण व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा पालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे, प्रा. नीतिषा पंडित, प्रा.नीलिमा धालपे , मृदाशास्त्र व कृषी रसायन तज्ञ प्रा. जी. एस. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत ठोंबरे सौरभ, धायगुडे प्रणव, वडणे अथर्व, सकट उत्कर्ष, तूपसौंदर ओंकार, थोरात चरण, फरांदे संकेत आणि पिसाळ रवीकुमार यांनी हा उपक्रम पार पडला.
Comments
Post a Comment