रावडी बु. येथे कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषी दुतांकडून राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा.
फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.
फलटण तालुक्यातील रावडी बु.येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदूतांनी ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमांतर्गत कृषीदूतांनी राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा साजरा केला.
संपूर्ण देशामध्ये भारताचे ५ वे पंतप्रधान श्री चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 23 डिसेंबर रोजी किसान दिवस म्हणून ओळखला जाणारा राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून रावडी बु. येथे राष्ट्रीय शेतकरी दिवस आयोजित केला होता.यावेळी कृषी दुतांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यास जमीन चे आरोग्य चांगले रहण्यास मदत होणार असून विषमुक्त शेतमाल तयार करण्यासाठी यावेळी शेतकऱ्यांना अहवान केले.या कार्यक्रमात कृषी दुतांनी नैसर्गिक शेती गट योजना मध्ये शेतकऱ्यानी सहभागी होऊन सेंद्रिय शेती च्या माध्यमातून सेंद्रिय शेती माल उत्पादन करणे बाबत आव्हान केले. पुढच्या पिढीला सुपीक जमीन देण्यासाठी आणि वाढत्या लोकसंख्येच्या अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी जमीन सुपीकता असणे आवश्यक आहे त्यामुळे माती परीक्षणाचे महत्व व माती परीक्षणानुसार खताचा संतुलित वापर करणे रासायनिक खतावरील खर्च कमी करून योग्य खताची मात्रा दिल्यामुळे पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ होण्याबाबत माहिती जमलेल्या शेतकऱ्यांना कृषी दुतांनी दिली.कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू डी चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी- प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम, समन्वयक - प्रा. निलिमा धालपे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत जगताप प्रजोत, कदम रोहन, गौंड अनिकेत, गरगडे प्रणव, गोलांडे तुषार, गुरव ओंकार, सार्थक शेंडगे यांनी हा कार्यक्रम पार पडला.
Comments
Post a Comment