तीन वर्षापासून दहिवडी पोलीस स्टेशनच्या हातावर तुरी देऊन पळणारा आरोपी पुसेगाव पोलीस स्टेशनचे एपीआय संदीप पोमण यांना पकडण्यात यश.
तीन वर्षापासून दहिवडी पोलीस स्टेशनच्या हातावर तुरी देऊन पळणारा आरोपी पुसेगाव पोलीस स्टेशनचे एपीआय संदीप पोमण यांना पकडण्यात यश.
पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.
माणा व फलटण तालुक्यामध्ये गंभीर गुन्हातील फरार आरोपी गेले तीन वर्षापासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळणारा पुसेगाव येथील सेवागिरी महाराजांच्या यात्रेमध्ये रात्रीच्या वेळी पुसेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी एपीआय संदीप पोमण हे पेट्रोलिंग करत असताना हा आरोपी फिरताना मिळून आला त्याला तात्काल अटक करून पुढील तपासासाठी दहिवडी पोलीस ठाणे गु.र.नं145/2021 भा.दं.वि.सं.कलम 392,34 या गुन्ह्यातील व मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो दहिवडी यांचेकडील R.C.C.No.22/2022 पकड वॉरंट मधील पहिजे असलेला आरोपी नामे तिसराकोन उर्फ सुधीर जाकर काळे वय 21वर्षे रा.मोळ ता.खटाव जि. सातारा यास श्री.सेवागिरी महाराज यात्रा बंदोबस्त पेट्रोलिंग दरम्यान ताब्यात घेतला असून त्यास पुढील कार्यवाही कामी दहिवडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.सदर आरोपीविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाणेस 201/2021 कलम 457,380 प्रमाणे मालमत्तेचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंद आहे. असे साहेब पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी सांगितले आहे.
Comments
Post a Comment