फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना 25% पेट्रोल पंप व गॅस एजन्सी द्या:- राष्ट्रीय एफ. पी.सी. फेडरेशन संस्थापक संजय भगत.
फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना 25% पेट्रोल पंप व गॅस एजन्सी द्या:- राष्ट्रीय एफ. पी.सी. फेडरेशन संस्थापक संजय भगत.
पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.
केंद्र सरकारच्या आवाहनास प्रतिसाद देऊन शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्या रजिस्टर केल्या आहेत मात्र त्यांना व्यवस्थित व्यवसाय नसल्यामुळे त्या तोट्यात जाऊ लागल्या आहेत म्हणूनच आर्थिक प्राप्तीचा स्रोत म्हणून देशात 25% इंधन पंप त्याबरोबरच गॅस एजन्सी आरक्षित कोटा फार्मर प्रोडूसर कंपनी यांना द्यावा अशी मागणी राष्ट्रीय एफ. पी. सी. फेडरेशन संस्थापक संजय भगत यांनी केली आहे.राष्ट्रीय एफ. पी.सी. फेडरेशन ची स्थापना ही शेतकरी उत्पादक कंपनी ना आर्थिक आधार देणे, आर्थिक लाभाच्या दृष्टीने त्या कंपन्यांना विविध स्तरावर प्रशिक्षण देणे योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच वेगवेगळ्या अडचणी प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी न्याय मिळवून देणे यासाठी करण्यात आली आहे असे संजय भगत यांनी म्हटले आहे.केंद्र सरकारने आवाहन केल्या नंतर मागील पाच सात वर्षात मोठ्या प्रमाणात फार्मर प्रोडूसर कंपन्यांची (एफ. पी. सी.) निर्मिती झाली व रजिस्ट्रेशन झाले मात्र कंपनी ॲक्ट खाली रजिस्ट्रेशन झालेल्या एफ. पी. सी. ना योग्य दिशा व मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्या दंडात गेलेल्या आहेत बऱ्याच कंपन्या या बंद अवस्थेत असल्यामुळे केवळ कागदोपत्री दिसणाऱ्या कंपन्यापुढे फार अडचणी आहेत अशा परिस्थितीत फार्मर प्रोडूसर कंपन्यांना एक आधार देऊन भविष्यात दिशा देणे गरजेचे आहे . यासाठी राष्ट्रीय एफ. पी.सी. फेडरेशन काम करणार आहे.फेडरेशनचे अधिक माहितीसाठी व सदस्य होण्यासाठी या नंबर वरती संपर्क करावा -9763150577 असे आवाहन संजय भगत यांनी केले आहे.
Comments
Post a Comment