दांभिकतेच्या उन्मदावर लेखणीच्या अस्वस्थ मनांचा हुंकार : फलटणला ३७ व्या साहित्यिक संवाद मध्ये लेखकांचा सूर.

दांभिकतेच्या उन्मदावर  लेखणीच्या अस्वस्थ मनांचा हुंकार : फलटणला ३७ व्या  साहित्यिक संवाद मध्ये लेखकांचा सूर.

फलटण शहर प्रतिनिधी:-जुबेरभाई कोतवाल.
          
ज्योतिबाच्या डोंगरावर पुजाऱ्यांनी भक्ताला लाथा बुक्यांनी तुडवल ,नाईकबा डोंगरावर नेमकं काय घडलं एकीकडं अंधश्रद्धेच्या दरबारात राजकीय नेते एका दहावी पास भोंदूबाबाचे पाय धुवू लागलेले. दुसरीकडं श्रद्धेच्या प्रांगणात अर्थात चक्क मंदिरात भक्ताला लाथा-बुक्क्यांनी तुडवण्यात पुजारी रमलेले. मंत्रोच्चाराची वाणी शिव्यांची लाखोली वाहू लागलेली.या दांभिक उन्मादाबद्दल लोकमत कोल्हापूरचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे यांनी दांभिकतेचा उन्माद आपल्या लेखणीतून मांडला हाच दांभिकतेचा उन्माद विषयावर फलटण येथील ३७ व्या साहित्यिक संवाद मध्ये विचारमंथन करण्यात आले.यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते व जेष्ठ विचारवंत डॉ सुधीर इंगळे यांनी समाजात खरात सारख्या प्रवृत्तींना खतपाणी घालणाऱ्या शिक्षित आणि आर्थिक सक्षम घटकांवर ताशेरे ओढत याला आपली दांभिक मानसिकता जबाबदार असल्याचे सांगत लोकमत मधील लेखाचा दाखला देत आपल्या आस पास देखील या प्रवृत्ती उन्माद करत आहेत याला रोखण्यासाठी आपण आपल्या मानसिकतेत बदल करायला हवा असेही त्यांनी यावेळी सांगितले.माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी लेखकांच्या अस्वस्थ मनांचा हुंकार सांगताना जग युद्धामुळे अस्वस्थ होत आहे जग अशांत असताना आपण मात्र खरात सारख्या प्रवृत्तींना खतपाणी घालत आहे. बुवा बाजी फोफाळली असून साहित्यिकांना यावर आपल्या परखड लेखणीतून वास्तव मांडल पाहिजे. प्रा श्रेयस कांबळे यांनी दांभिकतेचा उन्माद या लेखाचा दाखला देत अनेक ठिकाणी सुरू असलेला या प्रकारावर चिंता व्यक्त केली सामाजिक स्वास्थ्य महत्वाचे असून दांभिक उन्माद करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच साहित्यिकांनी लेखणीने दांभिक उन्माद करणाऱ्यांना फटकारले पाहिजे असे मत व्यक्त केले.यावेळी आप्पा तांबे यांनी ग्रामीण भागातील  बुवाबाजीवर आधारित तरडगावचा आप्पा या कथेचे कथाकथन सादर केले.
यावेळी  माधुरी जगदाळे सविता तांबे , प्रमोद सस्ते ,आप्पासाहेब तांबे , प्रा विकास शिंदे , राजाभाऊ काकडे , सचिन जाधव , महादेव गायकवाड, योगेश जगदाळे, अनिल सोनवलकर

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.