मुधोजी हायस्कूलमध्ये महात्मा जोतिराव फुले यांची १९९ वी जयंती उत्साहात साजरी.

मुधोजी हायस्कूलमध्ये महात्मा जोतिराव फुले यांची १९९ वी जयंती उत्साहात साजरी.


फलटण प्रतिनिधी:-जुबेरभाई कोतवाल.

 फलटण एज्यूकेशन सोसायटी च्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये शनिवार दिनांक ११ एप्रिल २०२६ क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त प्रशालेत विविध उपक्रमाने जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास प्रशालेचे प्राचार्य मा श्री वसंतराव कृष्णा शेडगे, उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य श्री सोमनाथ माने, पर्यवेक्षक श्री आर एस नाळे, पर्यवेक्षक श्री आर बी निंबाळकर, यांच्या हस्ते क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे प्राचार्य वसंतराव शेडगे यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांचे सामाजिक कार्य , शैक्षणिक कार्य , याच्यावर प्रकाश टाकला तसेच या जयंतीनिमित्त अनेक विद्यार्थी व मान्यवर मंडळींची क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव गोविंदराव फुले यांच्या कार्याविषयी व त्यांच्या जीवनाविषयी त्यांच्या स्त्री शिक्षणातील योगदानाविषयी त्यांचे कार्य आपल्या भाषणातून मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ . वनिता लोणकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री  सुधाकर वाकुडकर यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उच्च माध्यमिक विभागातील व सकाळी विभागातील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.