बरड येथील जियो पेट्रोल पंपासमोरील अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू.

बरड येथील जियो पेट्रोल पंपासमोरील अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू.

फलटण प्रतिनिधी:- जुबेरभाई कोतवाल.

 फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथून मिळालेल्या माहितीनुसार व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 03/04/2026 रोजी दुपारी 1.15 वा. बरड येथील जियो पेट्रोल पंपच्या समोर उभ्या असलेल्या मालवाहतूक ट्रकला पाठीमागून मोटर सायकलची धडक झाली या भीषण अपघातात मोटारसायकल स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना फलटणच्या सरकारी दवाखाण्यात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.तरी दि. 03/04/2026 रोजी दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास मौजे बरड ता. फलटण जि. सातारा येथे सोपान गुलाबराव कदम वय वर्षे६४ रा.गुरसाळे ता माळशिरस जि सोलापूर यांचा अपघातात मृत्यू झालेला आहे.
पुढील तपास पोलिस हवालदार अमोल चांगण करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.