डिजिटल मीडियाच्या गोव्यातील राष्ट्रीय अधिवेशनासाठी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना निमंत्रण.

डिजिटल मीडियाच्या गोव्यातील राष्ट्रीय अधिवेशनासाठी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना निमंत्रण.

पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

सातारा :
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने गोवा येथे आयोजित करण्यात येत असलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनानिमित्त राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना निमंत्रण पत्रिका देण्यात आली.
गेल्या पाच वर्षांपासून डिजिटल मीडिया क्षेत्रात अविरत कार्यरत असलेली ही संघटना आता राष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, दिल्ली, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या सात राज्यांत विस्तारलेल्या या संघटनेचे तब्बल १५ हजारांहून अधिक सक्रिय सभासद आहेत. संघटनेचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन पणजी (गोवा) येथे पार पडणार असून, या अधिवेशनासाठी प्रमुख मान्यवरांपैकी एक म्हणून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.यावेळी संघटनेचे राज्य महासचिव विकास भोसले, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय पानसांडे, सहसचिव लिंगराज साखरे, सातारा जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज तांबोळी, जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ वाघमोडे, माण तालुकाध्यक्ष नितीन वाघमोडे, खजिनदार संदीप जठार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.