फलटण तालुक्यात अवकाळीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.आ.सचिन पाटील यांनी बांधावर जाऊन केली पाहणी पंचनामे करण्याचा प्रशासनाला दिले आदेश.
फलटण तालुक्यात अवकाळीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.आ.सचिन पाटील यांनी बांधावर जाऊन केली पाहणी पंचनामे करण्याचा प्रशासनाला दिले आदेश.
फलटण प्रतिनिधी:-जुबेरभाई कोतवाल.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे फलटण तालुक्यात बाधित झालेल्या क्षेत्राचा आमदार सचिन पाटील आणि युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर यांनी दौरा करून शेतीच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.
फलटण तालुक्यातील तरडगाव, कापडगाव, चांभारवाडी, हिंगणगाव परिसराला शुक्रवारी (दि. ३) दुपारी अवकाळी पावसाने झोडपले. त्यावेळी झालेल्या गारपिटीमुळे ऊस, मका, कांदा, गहू या पिकांसह
फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जनावरांचे गोठे आणि घरांचेही अतोनात नुकसान झाले आहे. ही परिस्थिती समजताच आमदार सचिन पाटील आणि अमरसिंह नाईक निंबाळकर यांनी बाधित क्षेत्राचा दौरा करून, नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यात आमदार पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून, त्यांना धीर दिला.यावेळी तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, मंडलाधिकारी खाडे, धेंडे आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत आणि पुढील कार्यवाहीसाठी अहवाल शासन दरबारी पाठवावा, असा आदेश आमदार सचिन पाटील यांनी दिला.
Comments
Post a Comment