निधीअभावी रुग्णांची हेळसांड; फलटणच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राची दयनीय अवस्था.

निधीअभावी रुग्णांची हेळसांड; फलटणच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राची दयनीय अवस्था.


फलटण प्रतिनिधी: जुबेरभाई कोतवाल.

फलटण शहराच्या मध्यवर्ती भागातील शंकर मार्केट परिसरात असलेल्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून निधीअभावी येथे मूलभूत वैद्यकीय सेवा ठप्प झाल्याने गोरगरीब रुग्णांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.आरोग्य केंद्राबाहेर “महालॅब मार्फत होणाऱ्या रक्त तपासण्या बंद आहेत” तसेच “टी.टी. इंजेक्शन उपलब्ध नाही” असे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय अधिकच वाढली आहे.
याबाबत आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता, निधीअभावी मागील आठ दिवसांपासून रक्त तपासणी सेवा बंद असल्याचे त्यांनी सांगितले. डॉक्टरांकडून तपासणी करण्याचा सल्ला दिला जात असला, तरी प्रत्यक्षात सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. योग्य निदानासाठी रक्त तपासणी अत्यावश्यक असताना ही सेवा बंद असल्याने उपचार प्रक्रियेत विलंब होत आहे.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाकडून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोट्यवधी रुपयांचा खर्च दाखवला जात असताना, प्रत्यक्षात फलटणमधील आरोग्य सेवा कोलमडलेली दिसून येत आहे. यामुळे अनेक रुग्णांना खासगी लॅबमध्ये जाऊन जादा खर्च करून तपासण्या कराव्या लागत आहेत.लोकनियुक्त नगर अध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.