समता पुरस्काराने प्रा. विकास शिंदे यांचा गौरव.

समता पुरस्काराने प्रा. विकास शिंदे यांचा गौरव.

 फलटण शहर प्रतिनिधी:-जुबेरभाई कोतवाल.

अखिल भारतीय समता परिषद, लक्ष सातारा यांच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, साहित्य, पत्रकारिता व संशोधन या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा समता पुरस्काराने गौरव करण्यात आला. या सोहळ्यात दैनिक लोकमतचे फलटण तालुका प्रतिनिधी तसेच भारतीय पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. विकास शिंदे यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरी व समाजाभिमुख पत्रकारितेबद्दल समता पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा सन्मान सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते तर फलटण नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येत समाजहितासाठी योगदान देणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले.यावेळी समता परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. बी. के. यादव, सातारा जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सभापती सौ. लता कर्णे, मुधोजी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. प्रभाकर पवार तसेच विडणीचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमात मान्यवरांनी आपल्या मनोगतातून समाजात समता, बंधुता व प्रगतीशील विचारांची गरज अधोरेखित केली. विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करून त्यांचे योगदान अधोरेखित करण्याचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.
समता पुरस्कारामुळे सन्मानित व्यक्तींना समाजकार्याची नवी प्रेरणा मिळत असून, प्रा. विकास शिंदे यांच्या पत्रकारितेतील कार्याबद्दल त्यांचा सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.