सरकारने हरभरा खरेदी मुदत 30 मे पर्यंत वाढवावी व दोन लाख टन खरेदी उद्दिष्ट द्या - राष्ट्रीय एफ.पी.सी. संस्थापक संजय भगत.

सरकारने  हरभरा खरेदी मुदत 30 मे पर्यंत वाढवावी व दोन लाख टन खरेदी उद्दिष्ट द्या -  राष्ट्रीय एफ.पी.सी. संस्थापक संजय भगत.


 पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम. 

केंद्र शासनाच्या हमीभाव योजने  अंतर्गत राज्याचे हरभरा खरेदी उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे हरभरा खरेदी बंद आहे ती त्वरित सुरू करावी अशी मागणी  केंद्रीय कृषिमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्याकडे राष्ट्रीय एफ.पी.सी. फेडरेशन संस्थापक संजय भगत यांनी  केली  आहे.महाराष्ट्र राज्यासाठी केंद्रीय हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत सात लाख टनाचे हरभरा खरेदी उद्दिष्ट होते मात्र बाजारातील दर हे हमीभावापेक्षा 700 ते 900 रुपये कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचा हरभरा विक्री करण्यासाठी ची पहिली पसंती ही हमीभाव खरेदी केंद्र राहिली यामुळे हे उद्दिष्ट मुदती अगोदर 24 एप्रिलच्या  दरम्यान पूर्ण झाले यामुळे अचानक पोर्टल बंद करण्यात आले.हरभरा हमीभाव केंद्रात घालता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय झाली आहे व हमीभाव केंद्र चालवणाऱ्या संस्था,कंपन्या चालक यांची कोंडी झाली व शेतकऱ्यांच्या रोशास सामोरे जावे लागत असल्यामुळे केंद्र सरकारने 15 मे पर्यंत खरेदी नोंदणी ची मुदत वाढवावी व खरेदीची मुदत ही 30 मे पर्यंत वाढवून मिळावी तसेच खरेदी उद्दिष्ट दोन लाख टनाने वाढवून मिळावे अशी मागणी करणारे पत्र श्री संजय भगत यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेल द्वारे पाठवले आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.