डॉ. वैशाली शिंदे यांना 'राष्ट्रीय अशोक सन्मान' प्रदान.

डॉ. वैशाली शिंदे यांना 'राष्ट्रीय अशोक सन्मान' प्रदान.

'वर्ल्ड ह्युमन राइट्स प्रोटेक्शन कमिशन'च्या नॅशनल प्रेसिडेंटपदी नियुक्ती

फलटण शहर प्रतिनिधी: -जुबेरभाई कोतवाल.

 देशाच्या राजधानीतील सोहळ्यात फलटणच्या शैक्षणिक क्रांतीचे नेतृत्व करणाऱ्या व फलटण' च्या आयडियल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या संस्थापिका डॉ. वैशाली शिंदे यांचा त्यांच्या अष्टपैलू कार्याबद्दल अत्यंत प्रतिष्ठेचा असा  'राष्ट्रीय अशोक सन्मान' देऊन गौरव करण्यात आला. 'भारत गौरव रत्न श्री सन्मान अवॉर्ड - कौन्सिल'द्वारे आयोजित या 'ग्रँड सेमिनार 'मध्ये राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत - उपस्थित होते. दिल्लीचे उपमुख्यमंत्री परवेश वर्मा आणि हरियाणाचे माजी राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांसारख्या दिग्गज मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत डॉ. सौ. वैशाली शिंदे यांना हा - मानाचा सन्मान बहाल करण्यात आला. यावेळी डॉ. सौ. शिंदे यांच्या प्रदीर्घअनुभवाची आणि समाजहिताप्रती असलेल्या निष्ठेची दखल घेत त्यांची 'वर्ल्ड ह्युमन राइट्स प्रोटेक्शन कमिशन' या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या' राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या जागतिक स्तरावरील संस्थेचे सदस्यत्व व ओळखपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
'राष्ट्रीय अशोक सन्मान' हा अशाच व्यक्तींना दिला जातो ज्यांनी शून्यातून विश्व उभे करत समाजासमोर आदर्श प्रस्थापित केला आहे. डॉ. सौ. वैशाली शिंदे यांनी आपल्या 'आयडियल इंटरनॅशनल स्कूल'च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जे नाविन्यपूर्ण प्रयोग राबवले, त्याची दखल आज राष्ट्रीय स्तरावर घेतली जात आहे. त्यांच्या या दैदिप्यमान यशाचे वृत्त समजताच त्यांच्या अष्टपैलू कार्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.