2 लाख 25 हजारची सापडलेली सोन्याची चैन प्रामाणिकपणे संतोष यादव यांनी केली परत.

2 लाख 25 हजारची सापडलेली सोन्याची चैन प्रामाणिकपणे संतोष यादव यांनी केली परत.

 पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

रणसिंगवाडी तालुका खटाव येथे गावांमध्ये  ग्रामदैवत श्री भैरवनाथ माता जोगेश्वरी हे एक जागृत देवस्थान असून येथे गावातील सर्व मंडळी भैरवनाथ जोगेश्वरीची मनापासून सेवा करतात भैरवनाथाची यात्रा अष्टमीला धुमधडाक्यात होते या यात्रेनिमित्त भैरवनाथाची जोगेश्वरीची पालखी गावामधून मिरवणूक निघते यावेळी विठ्ठल बबन जाधव यांची लेझीम खेळताना दीड तोळ्याची सोन्याची चैन खाली पडली होती ती सोन्याची चैन   संतोष विलास यादव यांना सापडल्यानंतर त्यांनी ती सोन्याची चैन यात्रा कमिटीतील सदस्याजवळ दिली व ज्याची आहे त्यांना द्या असं ते म्हणाले येथील गावकऱ्यांची एक परंपरा आहे कष्टाने खाईन परंतु फुकटच खाणार नाही त्यांनी क्षणाचाही विलंब न करता गावातील प्रतिष्ठित लोकांना मला एक वस्तू सापडलेली आहे. ती कोणाची आहे ती चौकशी करा विश्वास पाटील यानंतर ती त्यांना देऊन टाका असं सांगितलं संतोष यादव हे सामान्य कुटुंबातील असून ते मिस्त्री चे काम करतात परंतु कोणताही स्वार्थ न दाखवता भैरवनाथाच्या पालखी समोर आपल्याला चैन सापडलेली ती विठ्ठल विलास जाधव यांना परत केली व संतोष विलास यादव यांचा प्रामाणिकपणा दाखवल्याबद्दल देवस्थान ट्रस्टमार्फत सन्मान करण्यात आला तर रणसिंगवाडी गावातून त्यांना सर्व ग्रामस्थ, विविध मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी विविध पक्षाचे पदाधिकारी, महिलावर्ग संतोष यादव यांचे अभिनंदन व कौतुक करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.