पुसेगाव येथे रक्तदान शिबिर उत्साहात; ७५ जणांचा सहभाग.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
पुसेगाव ता .खटाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून सह्याद्री मंडळ व पुसेगाव पत्रकार संघाच्या वतीने आज येथील शंकर पार्वती मंगल कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिरात ७५ जणांनी सहभाग घेत आपली सामाजिक बांधिलकी जपली.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव आणि श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच विजय मसणे, विश्वस्त संतोष वाघ, उपसरपंच पृथ्वीराज जाधव, माजी चेअरमन शिवाजीराव जाधव, प्रा. जगन्नाथ जाधव, सह्याद्री मंडळ व पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.रुग्णांना रक्ताची अडचण भासू नये यासाठी शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने सह्याद्री मंडळ आणि पुसेगाव पत्रकार संघ यांच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. दरम्यान, मान्यवरांनी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून त्यामुळे आपण देशाची एक प्रकारे सेवा करत असल्याचे उद्घाटनप्रसंगी नमूद केले.
Comments
Post a Comment