कोरेगाव शहरावर लादण्यात आलेल्या अन्यायकारक विकास आराखडा रद्द करण्याच्या मागणीसाठी कोरेगाव बचाव संघर्ष समितीचा कोरेगाव शहरातून मोर्चा.



कोरेगाव शहरावर लादण्यात आल्या अन्यायकारक विकास आराखडा रद्द करण्याच्या मागणीसाठी कोरेगाव बचाव संघर्ष समितीचा कोरेगाव शहरातून मोर्चा.

कोरेगाव प्रतिनिधी. अज्जू मुल्ला. 

कोरेगाव. 6 फेब्रुवारी कोरेगाव  शहरावर शासनाच्या वतीने लादण्यात आलेला अन्यायकारक शहर विकास आराखडा हा कोरेगावातील मूळ शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा असून कोरेगाव शहरातील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे..त्यांच्या जमिनी आरक्षित केल्यास त्यांच्यावर अन्याय होणार आहे.. आधीच जमिनी कमी असताना आरक्षण झाल्यास आम्ही भूमिहीन होत आहोत.. उर्वरित जमिनीवर कोणतीही बँक कर्ज, गहाण, तारण देणार नाही.. येणाऱ्या पिढीस कोणत्याही प्रकारच्या जमिनी शिल्लक राहणार नाही..कोरेगावकरांना कधीही शंभर फूट, पन्नास फूट रस्त्याची आवश्यकता नव्हती आणि पुढील वीस वर्षात लागणार नाही.. तरीही आमच्या जमिनीत रस्त्यात घालून आम्हाला भूमिहीन करण्याचा शासनाचा डाव आहे.. याच्या विरोधात कोरेगाव बचाव संघर्ष समितीच्या वतीने कोरेगाव शहरातून मोर्चा काढण्यात आला.. यामध्ये जमिनी आरक्षित करून आम्हास भूमिहीन करू नये आणि कोरेगावकरांवर लादण्यात आलेला अन्यायकारक विकास नावाचा आराखडा रद्द करावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला..

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.