सौ. वैशाली रसाळ- शिंदेंची कक्ष अधिकारीपदी पदोन्नती.

सौ. वैशाली रसाळ- शिंदेंची कक्ष अधिकारीपदी पदोन्नती.

कोरेगाव प्रतिनिधी. अज्जू मुल्ला. 

कोरेगाव, ता. २५ : मंत्रालयीन संवर्ग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील सहायक कक्ष अधिकारी तसेच विधि आणि न्याय विभागातील सहायक कक्ष अधिकाऱ्यांच्या (विधि) कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठी झालेल्या विभागीय परीक्षा - २०२२ मध्ये येथील सौ. वैशाली बाळासाहेब रसाळ - शिंदे या १६५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना कक्ष अधिकारीपदी पदोन्नती मिळाली आहे. सिडनहॅम वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय, बी रोड, चर्चगेट, मुंबई येथे २७ जून ते एक जुलै २०२२ या कालावधीत या परीक्षा झाल्या होत्या. सौ. वैशाली या सद्या मंत्रालयामध्ये वित्त विभागात अधिकारीपदी कार्यरत होत्या. इंदापूर (जि. पुणे येथील) मूळ रहिवाशी आणि आसाममध्ये "सीआरपीएफ"मध्ये कार्यरत रोहित शिंदे यांच्या सौ. वैशाली या पत्नी, तर येथील प्रेस फोटोग्राफर शेखर रसाळ यांच्या त्या भगिनी आहेत. सौ. वैशाली यांनी कक्ष अधिकारी परीक्षेमध्ये उज्वल यश मिळवल्याबद्दल त्यांचे इंदापूर व कोरेगाव शहर, परिसरात सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.