हम तो राधे शाम कहेंगे हम तो सीताराम कहेंगे.." माननीय श्री इंद्रजीत देशमुख.

हम तो राधे शाम कहेंगे हम तो  सीताराम कहेंगे.."  माननीय श्री इंद्रजीत देशमुख.

कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.

सरस्वती विद्यालय कोरेगाव वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व कृतज्ञता पंधरवडा समारोप कार्यक्रमात शिवम प्रतिष्ठान संस्थापक माननीय श्री इंद्रजीत देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.त्यांनी सुरुवातीलाच उपस्थित विद्यार्थांना *"हम तो राधे शाम कहेंगे हम तो  सीताराम कहेंगे.." जयजय करीत प्रोत्साहित केले.
यावेळी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री किशोर बाचल मुख्याध्यापक एस व्ही भातखंडे उपमुख्याध्यापक आर बी बर्गे पर्यवेक्षक वाय एस जाधव यासह शालेय समितीचे चेअरमन डॉक्टर श्री सच्चिदानंद गोसावी माननीय श्री हितेश खेडा माननीय श्री अनंत भूषण शहा माननीय श्री सागर भुंजे आदी मान्यवर उपस्थित होते.सरस्वती विद्यालयात शनिवार दिनांक 4 फेब्रुवारी सकाळी डॉक्टर श्री सच्चिदानंद गोसावी यांच्या हस्ते ध्वजारोहण व उद्घाटन करण्यात आले.चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन श्री अनंत भूषण शहा, रंगावली प्रदर्शन चे उद्घाटन श्री रजनीकांत भंडारी मास्टरिंग इंग्लिश दालन उद्घाटन श्री प्रेमजी पटेल जिज्ञासा दालनाचे उद्घाटन सुरेश कुलकर्णी रामानुजन गणितीय दालन उद्घाटन श्री प्रदीप बाचल खरी कमाई दालनाचे उद्घाटन किशोर बर्गे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.दुपारच्या सत्रात पारितोषिक वितरण समारंभात सरस्वती सुमन हस्तलिखित प्रकाशन प्रमुख अतिथी माननीय श्री इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.विज्ञान हस्तलिखित प्रकाशनाचे उद्घाटन श्री देवीचंद वसवाल यांच्या हस्ते करण्यात आले.यशोगाथा सरस्वतीची पुस्तिका प्रकाशन श्री मनीष शहा यांच्या हस्ते करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.