पुसेगाव येथे सह्याद्री मंडळ व पुसेगाव पत्रकार संघ रक्तदान शिबिराचे आयोजन.

पुसेगाव येथे सह्याद्री मंडळ व पुसेगाव पत्रकार संघ रक्तदान शिबिराचे आयोजन.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून येथील सह्याद्री मंडळ आणि पुसेगाव पत्रकार संघाने रविवारी (ता. २६) रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. येथील शंकर-पार्वती मंगल कार्यालयात सकाळी ९ ते ३ पर्यंत हे शिबिर पार पडणार आहे. रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी होऊन समाजाप्रती आपले कर्तव्य बजावावे, असे आवाहन सह्याद्री मंडळ व पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.दरम्यान, संयोजकांकडून सामाजिक बांधिलकीतून प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट किंवा वॉटर जार भेट देण्यात येणार आहे. तर ब्लड बँकेकडून प्रमाणपत्र व रक्त संबंधी सुविधा दिल्या जाणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.