कोरेगाव तहसील कार्यालयातील अव्वल कारकून सुनील बोतलजी प्रदीर्घ सेवेतून निवृत्त; महसूल विभागातर्फे शानदार कार्यक्रमात निरोप, कोरेगावकर नागरिकांची लक्षणीय उपस्थिती.

कोरेगाव तहसील कार्यालयातील अव्वल कारकून सुनील बोतलजी प्रदीर्घ सेवेतून निवृत्त; महसूल विभागातर्फे शानदार कार्यक्रमात निरोप, कोरेगावकर नागरिकांची लक्षणीय उपस्थिती.

कोरेगाव प्रतिनिधी. अज्जू मुल्ला. 

कोरेगाव तहसील कार्यालयातील एकात्मिक नागरिक सुविधा केंद्र अर्थात सेतू कार्यालयातील अहवाल कारकून सुनील वसंतराव बोतलजी हे प्रदीर्घ शासकीय सेवेतून मंगळवारी निवृत्त झाले. कोरेगाव महसूल उपविभागातर्फे प्रांताधिकारी कार्यालयातील सभागृहात एका शानदार कार्यक्रमात त्यांना सहकुटुंब निरोप देण्यात आला. यावेळी कोरेगावकर नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.अंशकालीन कर्मचारी म्हणून आपल्या शासकीय सेवेची सुरुवात करणारे सुनील बोतलजी हे सर्वसामान्य जनतेचे एक आशास्थान आहे. त्यांनी नोकरीच्या प्रत्येक टप्प्यात सर्वसामान्यांच्या हितासाठीच काम केले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा विभाग, जावली तालुका, भूसंपादन विभाग आदी ठिकाणी त्यांनी महसूल सहाय्यक व अव्वल कारकून म्हणून सेवा बजावली. कोरेगावात बदली झाल्यानंतर त्यांनी आपल्या गावाच्या हिताची अनेक कामे केली. त्यांच्याकडे सर्वसामान्यांशी निगडित असलेल्या पुरवठा विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली. कोविड काळात त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन सर्वसामान्यांना अन्नधान्य पोहोचविण्याचे काम केले. स्वतःच्या प्रकृतीची अजिबात काळजी न करता कार्यालय हे घर मानून ते दोन वर्ष आपल्या सहकाऱ्यांसमवेत अहोरात्र काम करत होते. त्यानंतर त्यांची एकात्मिक नागरिक सुविधा केंद्र अर्थात सेतूमध्ये बदली झाली. त्यांनी शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्याशी निगडित असलेले दाखले, प्रतिज्ञापत्र आदींची कामे झटपट मार्गी लावली. अभिलेख कक्ष रेकॉर्ड रूमची जबाबदारी देखील त्यांनी उत्कृष्टपणे पार पा. एकूणच त्यांनी आपल्या शासकीय सेवेत सर्वसामान्य जनता हेच दैवत म्हणून काम केले. मंगळवार दिनांक 31 जानेवारी रोजी ते शासकीय सेवेतून निवृत्त झाले. प्रांताधिकारी ज्योती पाटील, निवासी नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे, निवडणूक नायब तहसीलदार सारिका शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व कोरेगाव महसूल विभागातील सर्व अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, मंडल अधिकारी, तलाठी व कोतवाल यांच्या उपस्थितीत एका शानदार कार्यक्रमात सुनील बोतालजी यांना सपत्नीक निरोप देण्यात आला. त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. भविष्यकाळात देखील कोरेगावकरांच्या सेवेत कायम राहणार असून महसूल खात्यात आलेला अनुभव गाठीशी बांधत सर्वसामान्यांना मदत करणार असल्याची ग्वाही सुनील बोतालजी यांनी सत्काराला उत्तर देताना दिली.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.