येस ग्रुपची करार शेती शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग - माजी जि.प. अध्यक्ष शिवाजीराव महाडिक.

येस ग्रुपची  करार शेती शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग -  माजी जि.प. अध्यक्ष शिवाजीराव महाडिक.

   पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होणे गरजेचे आहे त्यासाठी येस ग्रुप च्या करार शेतीतून शेतकऱ्यांना हमीभावाबरोबरच अधिकचा नफा मिळत असल्यामुळे शेतकरी करारशेतीकडे वळत असून याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन माजी जि.प.  अध्यक्ष शिवाजीराव महाडिक यांनी केले 
जाखणगाव ता. खटाव येथील येस ग्रुपच्या गोडाऊन व प्रोजेक्ट ला भेटीवेळी श्री महाडिक सर बोलत होते यावेळी  येस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय भगत तानाजीराव मदने ,अनिल शिर्के, ओंकार भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. 
शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होणे गरजेचे असून शेतकऱ्यांना कष्ट करण्यातची सवय लागली आहे मात्र त्याच्यातून  पिकणाऱ्या मालाला हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नफा होत नाही मात्र तो हक्काचा नफा मिळवून देण्याची योजना म्हणजे करार शेती असून या करार शेतीच्या माध्यमातून येस ग्रुपने शेतकऱ्यांना हमखास नफा देण्याची खात्री दिल्याने सातारा जिल्ह्यातील शेतकरी करार शेतीकडे वळत असल्याचे श्री महाडिक सर यांनी मत व्यक्त केले
यावेळी तानाजीराव मदने ,अनिल शिर्के, प्रवीण बोभाटे, प्रल्हाद बोभाटे ,सतीश झांजुर्णे, शहाजी सपकाळ ,श्रीमती चव्हाण मॅडम व्यवस्थापक रंजीत भोसले यांनी सर्वांचे आभार मानले .
खरीप 2023 साठीच्या सोयाबीन व घेवडा पिकासाठीचे करार लवकरच सुरू होणार असून शेतकऱ्यांनी  8308790475,   8530690475 या मोबाईल नंबर वरती व्हाट्सअप मेसेज करून किंवा फोन करून नावे नोंदवावीत व करार शेतीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत यांनी केले. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.