ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक इब्राहिम मेहबूब खान यांचे निधन; शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक इब्राहिम मेहबूब खान यांचे निधन; शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार.

कोरेगाव प्रतिनिधी. आज्जू मुल्ला. 

गोवा मुक्ती स्वातंत्र्य लढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक व कोरेगाव मुस्लिम समाजाचे अध्यक्ष इब्राहिम मेहबूब खान वय९१, यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते निसार खान व व्यावसायिक मुस्ताक खान यांचे ते वडील होत. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.इब्राहिम मेहबूब खान यांनी प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल केली. त्यांनी गोवा मुक्ती स्वातंत्र्य लढ्यात हिरहिरीने भाग घेतला. त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना उच्च विद्या विभूषित केले. कोरेगाव मुस्लिम समाजाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगले काम केले.  समाजामध्ये एकोपा वाढीस लागावा यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, निवासी नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे, मंडल अधिकारी शिवाजीराव पिसाळ, तलाठी किरण पवार यांनी प्रशासनाच्यावतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.