सोसायटीचे चेअरमन विजय लावंड यांची श्रीनिवास पाटील यांना वाढदिवसादिनी अनोखी भेट.
सातारा 24 तास न्यूज. संपादक. प्रतिनिधी
अकबर भालदार.
सातारा जिल्ह्याचे खासदार माननीय श्री श्रीनिवास पाटील यांचे 82 व्या वाढदिवसानिमित्त खातगुण तालुका खटाव सोसायटीचे चेअरमन श्री विजय लावंड यांच्यावतीने खासदार श्रीनिवास पाटील यांना अनोखी भेट देण्यात आली खासदार श्रीनिवास पाटील यांचा वाढदिवस कराड येथे नुकताच साजरा करण्यात आला, वाढदिवस प्रसंगी खातगुण सोसायटीचे चेअरमन विजय लावंड,संचालक हरिश्चंद्र लावंड, अंकुश जाधव राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष सुबोध जाधव व बिपिन माने यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त 82 वह्या व 82 पेन साहेबांना भेट दिली या अनोख्या भेटीने खासदार भारावून गेले. यावेळी बोलताना खासदार म्हणाले फुल गुच्छ देण्यापेक्षा अशा भेटवस्तू निश्चितच समाजासाठी उपयुक्त ठरतील, व या वस्तूचा दैनंदिन जीवनामध्ये समाज भिमुख कार्यासाठी निश्चित फलदायी ठरेल! अशाच प्रकारच्या भेटवस्तू प्रत्येकाने दिल्यास योग्य ठिकाणी कारणी लागतील,असे गौरव उदगार विजय लावंड व सहकार्यास व्यक्त केले. या वाढदिवस कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment