सातारा-पंढरपूर रस्त्याच्या काँक्रिटला भेगा पडल्या रमेश उबाळे यांचा आरोप.रस्त्याच्या भरावाला काळी माती वापरली, कामामध्ये मोठा भ्रष्टाचार, पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवेदन.

सातारा-पंढरपूर रस्त्याच्या काँक्रिटला भेगा पडल्या रमेश उबाळे यांचा आरोप.रस्त्याच्या भरावाला काळी माती वापरली, कामामध्ये मोठा भ्रष्टाचार, पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवेदन. 

कोरेगाव प्रतिनिधी. अज्जू मुल्ला. 

 
सातारा- लातूर या राष्ट्रीय महामार्गाच्या काम करताना कॉंक्रिट टाकण्यापूर्वी रस्ता मजबुतीसाठी दर्जेदार मुरूम, खडी वापरण्याची गरज असते परंतु संबंधीत ठेकेदाराने असे न करता चक्क मोठे दगड तसेच काळी माती वापरल्याने काही ठिकाणी रस्ता खचला असून समेंट काँक्रिटला भेगा पडल्या असल्याने या रस्त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष रमेश उबाळे यांनी थेटा दिल्ली दरबारी असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी निवेदन वजा  पत्र लिहून केला आहे एकीकडे काँक्रिट रस्ता ४०-  ५० वर्षे टिकत असल्याच्या मंत्री,नेत्यांकडून सांगण्यात   येत  असताना दोन-तीन  वर्षामधेच रस्त्याला भेगा पडत असल्याचे रमेश उबाळे यांनी  जनतेच्या निदर्शनास आणल्याने  मोठी खळबळ उडाली आहे.
सातारा- लातूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुमारें तीन चार वर्षांपासून सुरू आहे. या रस्त्याच्या कामाची वाटचाल पूर्णत्वाकडे सुरू असतानाच रमेश उबाळे यांनी सातारा ते पंढरपूर असा प्रवास करून रस्त्याची पाहणी केली असता    काही ठिकाणी त्यांना रस्ता खचून रस्त्याला भेगा पडल्या असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी अधिक माहिती घेतली असता काँक्रिट करण्यापूर्वी काँक्रिटच्या खाली टाकण्यात येणाऱ्या भरावासाठी रानातील काळी माती वापरल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर  रमेश उबाळे थेट दिल्ली येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाशी पत्र व्यवहार करून याची पोलखोल केली आहे. यांनी पंतप्रधान कार्यालयात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सातारा-पंढरपूर रस्त्याचे काम प्लॅन व प्रोफाइलनुसार झाले नाही. रस्त्याच्या कामाच्या भरावामध्ये मोठमोठे दगड टाकण्यात आले आहेत खरे तर ७५  एम.एम. पेक्षा मोठा दगड नियमानुसार भरावासाठी चालत नाही परंतु परंतु भरावासाठी १-१ मीटरचे दगड टाकण्यात आले आहेत. एवढेच नाही तर भरावामध्ये काही ठिकाणी काळी मातीही वापरण्यात आली आहे. त्यामुळे  ठीकठिकाणी  रस्ता खचला असून सिमेंट कॉंक्रिटला भेगा पडल्या आहेत. संबंधीत ठेकेदाराने कटिंग केलेले मटीरीयल रस्त्याच्या भरावमध्ये वापरले आहे. सदर मटेरियलची रॉयल्टी भरण्यात आली नाही. पुलाच्या कामामध्ये निकृष्ठ दर्जाचे कॉंक्रिट वापरले आहे. काँक्रिट मिक्स डिझाइनमध्ये बदल केले आहेत. पुलाच्या स्लॅबवरती ६५  एम.एम. जाडीचा थर टाकणे गरजेचे असताना २५ एम.एम.टाकला असून यामध्ये खूप मोठी तफावत असल्याचे निदर्शनास येते. रस्त्याचे काम करत असताना शेतकऱ्यांच्या पाईपलाईनसाठी ५०० -५०० मीटर अंतरावर क्रॉसिंग द्यावे लागत असताना ठेकेदाराने कुठेही क्रॉसिंग ठेवले नाही. भविष्यात क्रॉसिंगकरता रस्ता फोडावा लागेल. प्रत्येक पुलाच्या कामाचे दोन्ही बाजूचे भराव खाली दबले असल्याने प्रवास करताना वाहन आदळून अपघात होत आहेत.वरील सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने संबंधीत ठेकेदाराचा  काळ्या यादीत समाविष्ट करावा अन्यथा आपण एन.एच.आय.चे  पुणे येथील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे. रमेश उबाळे यांनी यासाठी तीस दिवसांची मुदत दिली असून प्रशासकीय पातळीवर दखल न घेतल्यास दि. ९ मार्च २०२३ पासून आमरण उपोषण करणार आहे माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास संबंधित अधिकारी जबाबदार असतील म्हणून माझ्या निवेदनाचा आपण विचार करावा ही विनंती आहे. असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. प्रसंगी दिल्लीत आंदोलन करणार 
काही दिवसांपूर्वी सातारा येथील मेडिकल कॉलेजचा प्रश्न रमेश उबाळे यांनी धसास लावून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले होते.
लोकप्रतिनिधी,प्रशासनाच्या विरोधात टोकाला जाऊन निर्णय घेणारे नेते, सामजिक कार्यकर्ते म्हणून रमेश उबाळे यांची ओळख आहे. सातारा-लातूर हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने हा विषय केंद्र शासनाच्या संबंधित आहे. सुमारे एक महिन्याची मुदत त्यांनी शासनाला दिली आहे. प्रसंगी आपण राज्याची राजधानी व देशाच्या राजधानीत जाऊन आपली आंदोलन करण्याची तयारी असल्याचे रमेश उबाळे म्हणाले.पाच आमदार व तीन खासदारांच्या मतदार संघाशी संबंधित प्रश्न?सातारा- लातूर महामार्ग हा सातारा, कोरेगाव, माण, पंढरपूर, मेढा विधानसभा मतदारसंघातुन जातो. त्यामुळे पाच आमदार व तीन खासदारांशी संबंधित हा प्रश्न असल्याने या प्रश्नावर हे लोकप्रतिनिधी काय निर्णय घेणार? याचीही चर्चा  आहे.या सर्व लोकप्रतिनिधिंशी आपण पत्रव्यवहार करणार असल्याचे रमेश उबाळे यावेळी म्हणाले.पुणे-सातारा रस्त्याचे कामही निकृष्ठ पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाबाबतही अनेक तक्रारी असल्याचे संगत रमेश उबाळे म्हणाले,हे काम २०१० ला सुरू झाले होते २०१३ ला पूर्ण होणे अपेक्षित होते परंतु हे अद्याप पूर्ण झाले नाही. रस्त्याची लेव्हल, स्लोप व ग्रेडियंट नकाशानुसार झाले नसल्याने रस्त्यावर पाणी साठुन खड्डे पडल्याने अपघात होत आहेत. सुरूर येथील उड्डानपूलाचे काम मंजूर आराखड्याप्रमाणे झाले नाही. अनेवाडी टोलनाक्यावर केलेल्या काँक्रिट रस्त्यावर खड्डे व भेगा पडले आहेत. अनेक ठिकाणी भुयारी मार्गाचे काम निकृष्ठ झाल्याचे उबाळे म्हणाले याबाबतही निवेदन दिल्याचे ते म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.