राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खटाव तालुक्याच्या झुंजार महिला कार्याध्यक्ष सौ. मुमताज मुलाणी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम.


 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खटाव तालुक्याच्या झुंजार महिला कार्याध्यक्ष सौ. मुमताज मुलाणी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम.

 सातारा 24 तास न्यूज संपादक. प्रतिनिधी.
 अकबर भालदार.


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खटाव तालुक्याच्या झुंजार  महिला कार्याध्यक्ष सौ.मुमताज मुलाणी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम केला असून,तशा आशयाचे पत्र  राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना पाठविले असल्याचे  सौ. मुमताज मुलाणी यांनी निवेदनात म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या लेटर पॅड वर दिलेल्या निवेदनामध्ये मुमताज मुलाणी यांनी म्हटले आहे की,  गेल्या पाच वर्षापासून महिला तालुका कार्याध्यक्ष या पदावर कार्यरत असून, पक्ष वाढीसाठी सर्व प्रकारे प्रयत्न करून,तसेच विविध बचत गटाच्या माध्यमातून महिलांना एकत्रित करणे,त्यांना व्यावसायिक मार्गदर्शन करणे, अशी कार्य करून लोकप्रियता मिळवली आहे. गेली पाच वर्षे निपक्षपाती पणे निस्वार्थ पक्षवाढीसाठी प्रयत्न केले. पक्षाच्या विविध निवडणुकांमध्ये पक्षाच्या आदेशानुसार सक्रिय होऊन पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. परंतु समाज सेवा करीत असताना व पक्षाचे काम करीत असताना मला मिळालेली महिला वर्गातील प्रसिद्धी,आपल्याच पक्षांच्या लोकांना सहन होत नाही. सामाजिक कार्य करीत असताना महिलांच्या तक्रारीनुसार व्यसनमुक्तीचे कार्य सुरू होते. जानेवारी अठरा रोजी स्थानिक दारू विक्रेता परिवाराने मला व माझ्या पतिवर खुनी हल्ला करून, माझ्या घरावर दगड विटाचा वर्षाव करून तसेच गलिच्छ शिवीगाळ करून, माझे घराच्या दुकानाची व गाडीची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. व जीवे मारण्याची धमकी दिली, सदरचा प्रकार इतका भयावह होता की,पाहणाऱ्याच्या काळजाला भिडत होता.झालेली घटना स्थानिक  राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेसाहेब यांना कळविली होती तरी त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही, आणि कुठलेही सहकार्य केले नाही, सदर अशा घटनेमध्ये किमान सहानुभूती दाखवणे तरी गरजेचे होते. परंतु स्वार्थी राजकारणापायी सहानुभूती सोडाच पण साधी फोन द्वारे सुद्धा विचारणा केली नाही, ही किती मोठी शोकांतिका आहे. माझ्यासारख्या एक महिला पदाधिकाऱ्याला अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसाधारण कार्यकर्त्याचे काय असा प्रश्न अनेकांना सत्तावीत आहे. रक्षक तेच भक्षक बनून चुकीच्या पद्धतीने लोकांना मार्गदर्शन करीत असतील तर त्यांच्याकडून अपेक्षा काय करायची असाही प्रश्न उपस्थित होत आहे.असो मी गेली पाच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रामाणिक व एकनिष्ठ राहून देखील मला पक्षाकडून न्याय मिळत नसेल तर मी या पक्षात राहून काय उपयोग!आणि म्हणूनच मी माझ्या पदाचा व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. असे या पत्रकात धडाडीच्या तसेच न डगमगणाऱ्या सौ.मुमताज मुलानी यांनी म्हटले आहे.व तशा आशयाचे पत्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील, खासदार सुप्रिया सुळे, महिला आयोग अध्यक्ष रूपालीताई चाकणकर, व सातारा जिल्हा अध्यक्ष सुमित्रा ताई यांना दिले आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.