खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी विसापूरकरांनी तयार राहावे जिल्हाध्यक्ष भरत लोकरे यांचे प्रतिपादन.
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.
देशात मोठ्या प्रमाणात नोकर भरती करणार असल्याचे सरकार सांगत आहे. त्यासाठी नऊ खाजगी कंपन्यांना ठेका दिला आहे. या ठेकेदारामार्फत नोकरी मिळाल्यास त्याला पेन्शनची हमी नाही. पगाराची हमी नाही. शासनाचे कोणतेही नियम लागू नाहीत. ठेकेदार तुम्हाला कधीही नोकरीवरून काढू शकतो. अशा नोकर भरती व खाजगीकरणास विसापूर ग्रामस्थांनी विरोध करावा यासाठी सातारा जिल्हा ओबीसी संघटनेने आयोजित केलेल्या वाघेश्वर मंदिर विसापूर येथील ओबीसी मेळाव्यात बोलताना जिल्हाध्यक्ष भरत लोकरे यांनी आपले विचार व्यक्त केले.अध्यक्षस्थानी माननीय वामन राऊत सर हे होते. तर कार्यक्रमाचे संयोजक प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉक्टर विश्वनाथ भांडवलकर यांनी केले.
नवनाथ कुंभार यांनी कुंभार समाजातील बांधवांनी तीन तारखेच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरील आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शिक्षणाचे वाटोळे होणार आहे. ज्या देशात शिक्षणाचे वाटोळे होते त्या देशाचे भविष्य काय असेल? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आपल्या मुलाबाळांना चांगले शिक्षण दिले की त्यांनी नोकऱ्या बंद केल्या. म्हणजे शासक वर्ग बहुजन समाजाची पिळवणूक करीत आहे. ती कालही करीत होता आणि आजही करीत आहे. तिचे स्वरूप फक्त बदलले आहे. म्हणून बहुजन समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श मानला पाहिजे शिका ,संघटित व्हा ,संघर्ष करा ,आपले हक्क मिळवण्यासाठी संघटित व्हा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.कार्यक्रमास राजेश ढोले, शिवाजी कुंभार ,पांडुरंग गुरव, प्रल्हाद सुतार ,रमेश पंडित, सुजाता सुतार, छाया सुतार, शशिकला हजारे, पार्वती राऊत, मंगल चिंचकर ,सुनिता हजारे, वंदना भांडवलकर ,सिंधुताई ससाणे. विद्या कुंभार ,ओबीसी महिला तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतचे सदस्य राजेश ढोले यांनी उपस्थित लोकांचे आभार मानले.
Comments
Post a Comment