विजयादशमी दसरा निमित्ताने पुसेगाव मधील वाहतुकीत बदल:-API आशिष कांबळे यांचे आवाहन.
पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.
पुसेगांव पोलीस ठाणे हद्दीत पुसेगांव ता. खटाव येथे सालाबादप्रमाणे विजयादशमी (दसरा) निमित्ताने दिनांक २४/१०/२०२३ रोजी नवरात्र उत्सवानिमित्ताने दुर्गादेवीच्या मिरवणुका निघत असुन सदर मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी जिल्हयातुन २५,००० ते ३०,००० भाविक येत असतात.सध्या सातारा पंढरपूर महामार्गाचे काम चालु असुन पुसेगांव येथे वाहतुक संथ गतीने चालु आहे. मोठे ट्रक, ट्रॉली, दुर्गा देवीची मिरवणुक, भाविकांची गर्दी यामुळे रस्ता वाहतुकीवर परीणाम होणेची शक्यता असल्याने सदर यात्रा कालावधीत वाहतुक सुरळीत राहणेसाठी व भाविकांची / नागरीकांची गैरसोय होवु नये याकरीता दिनांक २४ रोजी दुपारी १४.०० ते रात्रौ २४.०० या कालावधीत खालील प्रमाणे वाहन पार्किंग व वाहतुकीचे नियोजन होणे आवश्यक आहे.पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पोलीस अधिनियम कलम ३३ (१) (ब) प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारास अनुसरुन पुसेगांव येथील वाहतुक व्यवस्थेतं दिनांक २४ चे दुपारी १४.०० ते रात्रौ २४.०० वा पर्यन्त वाहतुक मार्गात खालील प्रमाणे बदल करण्यात येत आहे.१. सातारा बाजुकडुन दहिवडी बाजुकडे जाणार वाहने पुसेगांव गावात न जाता नेर- ललगुन-बुध- राजापुर / कुळकजाई मार्गे दहिवडीकडे जातील व दहिवडी बाजुकडुन येणारी वाहने कटगुण-खटाव- खातगुण जाखणगांव मार्गे औंध फाटयावरुन विसापुर मार्गे सातारा बाजुकडे जातील
२. वडुज बाजुकडुन फलटण बाजुकडे जाणारी वाहने पुसेगांव गावात न येता खटाव जाखणगांव-आँध फाटा- नेर- ललगुण मार्गे फलटण ला जाती. तसेच फलटण बाजुकडुन वडुज बाजुकडे जाणारी वाहने नेर- ललगुण-आँध फाटा-जाखणगांव-खटाव मार्गे वडुज बाजुकडे जातील३. दिनांक २४/१०/२०२३ रोजी दुपारी १४.०० ते रात्री २४.०० वा पर्यन्त चे कालावधीत शिवाजी चौक पुसेगांव येथुन दहिवडी बाजुकडु, फलटण बाजुकडे, सातारा बाजुकडे (चौकापासन ४ हि बाजुस ) २०० मीटर अंतरावर नो पार्किंग झोन करीता मान्यता देण्यात येत आहे.वरील नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३१ अन्वये कारवाईस पात्र राहतील याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी असे पोलीस अधीक्षक शेख यांनी सांगितले .
Comments
Post a Comment