शरीराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या चार गुन्हेगारांना सातारा जिल्ह्यातून केले तडीपार.
शरीराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या चार गुन्हेगारांना सातारा जिल्ह्यातून केले तडीपार.
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.
सातारा व कराड तालुक्यातील शरीराविरुद्धचे तसेच मालमत्तेचे नुकसान करणारे अट्टल टोळी मधील चार गुन्हेगार सातारा जिल्ह्यातून तडीपारचा आदेश देण्यात आला यामध्ये 1) अमित उर्फ कन्हैया सुनील साळुंखे वय 32 वर्षे राहणार नागठाणे टोळीप्रमुख. 2)साहिल रुस्तुम शिकलगार वय 24 वर्षे, टोळी सदस्य. 3) अमर उर्फ भरत संजय मोहिते वय 26 वर्षे ,टोळी सदस्य 4) आशिष बन्सीराम साळुंखे वय 27 वर्षे ,टोळी सदस्य यांच्यावर सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी खून करणे , खुनाचा प्रयत्न करणे ,दरोडे टाकणे ,जबरी चोरी करणे ,घरफोडी चोरी करणे ,विनयभंग करणे, बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ ,मारहाण दमदाटी करणे ,खंडणी करिता अपहरण करून खून करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, कायदेशीर रखवाली मधून पळून जाणे .आदी गुन्हे दाखल असल्याने बोरगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आर .जी .तेलतुंबडे यांनी सदर टोळी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे सातारा जिल्ह्यातून तडीपार करणे बाबत प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे सादर केलेला होता सदर प्रस्तावची चौकशी किरण कुमार सूर्यवंशी उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा शहर विभाग यांनी केली होती
यामधील टोळी ही सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांचे शरीराविरुद्धचे तसेच मालमत्तेचे नुकसान करून गुन्हे करीत होती त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक व कायदेशीर कारवाई करूनही ते जामिनावर बाहेर असल्यानंतर त्यांच्यावर वेळोवेळी करण्यात आलेली प्रतिबंधक कारवाई कारवाईचा कोणताही परिणाम त्यांच्यावर झाला नाही अगर त्यांचे गुन्हेगारी कृतीमध्ये सुधारणा झाली नाही तसेच त्यांच्यावर कायद्याचा कोणताही धाक न राहिल्याने अशा गुन्हेगारांवर सर्वसामान्य जनतेतून कडक कारवाई करण्याचे मागणी होत होती वरील टोळीला सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख यांच्यासमोर सुनावणी होऊन त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षे करिता हद्दपारचा आदेश पारित केला आहे तर नोव्हेंबर 2022 पासून 12 उपद्रवी टोळी मधील 35 इसमांना हद्दपार करण्यात आले आहे भविष्यातही सातारा जिल्ह्यामधील सराईत गुन्हेगारांविरोधात हद्दपारी, मोका ,एमपीडीएफ अशा प्रकारच्या कडक कारवाई करण्यात येणार आहेत सरकार पक्षाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक सातारा श्री बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानी गुन्हे शाखा सातारा पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पो .ना .प्रमोद सावंत, पो. कॉ. केतन शिंदे, म.पो कॉ. अनुराधा सनस यांनी पुरावे सादर केले आहेत.
Comments
Post a Comment