शिरंबे ता.कोरेगाव जि.सातारा येथील श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण.
शिरंबे ता.कोरेगाव जि.सातारा येथील श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण.
कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.
शिरंबे येथील ५० वर्षांची परंपरा असलेल्या अठरापगड जातींना एकत्र करुन वै.नामदेव आप्पा शामगावकर व युवकमित्र बंडातात्या कराडकर,वै.रघनाथ यादव महाराज.वै.ह.भ.प.लक्ष्मण सुतार गुरुजी यांच्या कृपाशिर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह अश्विन कृ.१०दि.०७/११/२०२३ मंगळवार ते कार्तिक शु.२दि१५/११/२०२३ बुधवार या कालावधीत ग्रामविकास भवनच्या समोरील प्रांगणात साजरा होत आहे. उद्घाटक विठ्ठल स्वामी मठाधिपती ज.स्वा.वडगाव, वेदमूर्ती गिरीश शास्त्री महाराज वरुडकर उंब्रज,ह.भ.प. भागवत भारती आळंदी,प.पू.परशुरामजी वाघ महाराज मठाधिपती देवदरी, शिवसेना नेते खा.आनंदरावजी अडसूळ मा.अर्थ राज्य मंत्री भारत सरकार,आमदार महेशजी शिंदे कोरेगाव,अॅड नितीन भोसले युवा नेते यांच्या उपस्थितीत किर्तनकार ह.भ.प.केशव महाराज मुळीक ल्हासूर्णे,ह.भ.प. उमेश महाराज दशरथे मानवत,ह.भ.प.संजय महाराज धोंडगे नाशिक, पांडुरंग महाराज घुले संस्थान देहू,ह.भ.प.अनिल महाराज पाटील बार्शी,ह.भ.प.श्रावन महाराज अहिरे मालेगाव,ह.भ.प.भरतहरी महाराज पाटील जळगाव, ह.भ.प.प्रमोद महाराज जगताप सुपा जागर, गुरुवर्य बंडातात्या कराडकर महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता होणार आहे.दैनंदिन पहाटे ४ते६ काकडा, सकाळी.९ व दु.४ नाष्टा,सकाळी८ते११ व २ते४ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वाचन,दुपारी ज्ञानाई भजन,गायन, सांय ५ते६ हरीपाठ,सांय ७ते९ किर्तन,९ते११ संतपंगत नंतर सुलतानवाडी, निगडी,एकसळ, कोरेगाव, कटापूर, सायगांव,शिरंबे यांचा हरि जागर तसेच खा.श्रीनिवास पाटील,खा.उदयनराजे भोसले,आ.शशिकातजी शिंदे, नितीन पाटील, यशवंत भाऊ भोसले, दयानंद भोसले, रणजित भोसले हे सदिच्छा भेट देणार आहेत.तसेच १५/११/२३ रोजी सकाळी रांगोळी स्पर्धा व दुपारी१ वा. दिंडी,सांय ९ वा.भारुड सम्राट ह.भ.प.लक्ष्मण महाराज राजगुरू इंदापूर बावडा यांचा भारुडाचा कार्यक्रम होणार आहेत.तरी सर्व पंचक्रोशीतील भाविक भत्कानी व सांप्रदायतील वारकरी बंधूंनी आवश्यक लाभ घ्यावा अशी पारायण मंडळा तर्फे कॅप्टन महादेव भोसले (मा.सरपंच व अध्यक्ष पारायण मंडळ शिरंबे) यांच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment