देऊरच्या वासना नदीकाठचे जागृत देवस्थान श्री मुधाईदेवी मंदिर.



देऊरच्या वासना नदीकाठचे जागृत देवस्थान श्री मुधाईदेवी मंदिर.

 कोरेगाव प्रतिनिधी,दत्ता सावंत.

देऊर गावाला  प्राचीन काळापासून  राजकीय व संस्कृतिक वारसा लाभलेला असून येथे सामाजिक धार्मिक दृष्टीने देवी देवतांना मानले  जाते व विविध देवता विषयक विधी पूर्वीपासून पार पाडल्या जात आहे भारतात प्राचीन काळापासून शक्तीच्शक्तीचा देवता म्हणजे काली दुर्गा भवानी चंडी आदिमाया या देवतांची उपवास केला जातोय. या आदिमायेचा महाराष्ट्रात कोल्हापूरचा  महालक्ष्मी - वाणी - नाशिकची सप्तशृंगी देवी ' तुळजापूरची तुळजाभवानी तर या माहूगारगडची रेणुका देवी ही साडेतीन शक्तीपीठे आहेत. यांना प्राचीन पंरपरा  आहे . या आदिमायेप्रमाणेच्या कोल्हापूरच्या महलक्ष्मीचे प्रतिक म्हणून मानले जाणारे देऊर येथील श्री मुधाऱदेवी दैवत सतराव्या शतकापासून देऊर मध्ये नांदात आहे. सातारा जिल्ह्याता  कोरेगाव  तालुक्याच्या  उत्तर भागा मध्ये वायव्येला २० कि. मी  अंतरावर तर सातारा पुणे राज्यमार्ग वर साताऱ्यापासून  २५ कि मी अंतरावर वसना नदीकाठी देऊर हे गाव वसलेले आहे. नागपूरच्या भोसले घराण्यातील प्रमुख रघुजी भोसले हे मूळचे देऊर गावाचे आहेत छत्रपती शाहूमहाराजांनी रघुजी भोसले यांना देऊरचे वतन दिलेले होते. रघुजी भोसले यांना देऊरचे राजे ( राजा ऑफ देऊर )  हा किताब मिळालेला होता. त्यांनी स्वकर्तृत्वाने आपल्या राज्याच्या विकास करुन नागपूर येथे राजधानी निर्माण केली. म्हणून त्यांनी नागपूरकर  भोसले या नावाने ओळख प्राप्त झाली.  आजही त्यांच्या तक्तालनी इतिहासाची  साक्ष देणारा राजवडा देऊर गावात उभा आहे. देऊर गाव पासून चार कि मी अंतरावर असलेल्या दहिगाव गावातील श्री  मुघोजीराव चव्हाण हे कोल्हापूरच्या श्री महलक्ष्मीच्या  पुजा अर्चचे अनेक वर्षे अखंडित कार्य करीत होते. त्यांना वार्धक्य आल्याने श्री महलक्ष्मीच्या पुजेसाठी कोल्हापूरला जाणे आवाक्यातबाहेरचे झाल्याने त्यांनी देवीला आपल्या गावी वास्तव्याला येण्याचे साकडे घातले. श्री मुधोजीरावांनी केलेल्या निरसीन भक्तीमुळे इच्छा पूर्ण करण्याचे ठरविले. मात्र देवीने एक अट घातली की, आपण स्वत:पुढे पाहत आपल्या गावाचा रस्ता धरावा मी तुमच्या मागे येते परंतु तुमच्या गावात पोहचेपर्यंत तुम्ही मागे वळून पाहायचे नाही  देवीची अट मुधोजीरावनी मान्य केली व ते अतिशय प्रसन्न होऊन आपल्या गावाचा मार्ग आक्रमू लागले. त्यांच्या मागे -मागे देवीने लहान बालिकेचे रुप धारुण करुन देवी चालू लागली त्यांच्या पायातील नुपूरांचा रुणझुंज आवाज ऐकत तल्लीन होऊन मुधोजीराव आपल्या गावाकडे जात असताना वाटेत देवापूर उर्फ देऊर गावातील एका टोकडीवर येऊन पोहोचले . आता दहिगाव अगदी जवळ  होते . त्याचवेळी देवी  महलक्ष्मीचे लक्ष देऊरमधील तुळजाभवानीच्या मंदिरात चाललेल्या उत्सवाकडे गेले आणि त्या    क्षणभर थांबल्यांनी नपुंरानी रुण झुण थांबली आणि मुधाजीरावांनी तंद्री भंग  पावली... !

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.