पुसेगाव पोलीस स्टेशनची धडक कारवाई रामोशीवाडी मधून एक गावठी पिस्तूल जप्त. SP .समीर शेख यांच्या कारकिर्दीत 81 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

पुसेगाव पोलीस स्टेशनची धडक कारवाई रामोशीवाडी मधून एक गावठी पिस्तूल जप्त. SP .समीर शेख यांच्या कारकिर्दीत 81 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.

पुसेगाव ता .खटाव येथील पोलीस स्टेशनची धडक कारवाई मध्ये   जाखणगाव( रामोशीवाडी ) ता .खटाव येथील अंकुश गणपत मदने हा गावठी कट्टा व तलवार घेऊन वावरत असल्याची गोपनीय माहिती पुसेगाव पोलिसांना मिळाल्यानंतर पुसेगाव पोलिसांनी ठाणे यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख, व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल यांना बेकायदा बिगर परवाना स्वतःची जवळ पिस्तोल यासारखी शस्त्र बाळगत असल्याच्या प्रकरणी इसमाची माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे पुसेगाव पोलीस स्टेशन यांनी एक पथक तयार करून त्या अनुषंगाने कारवाईचा आदेश देण्यात आला होता त्यास अनुसरून दिनांक 20 .10. 2023 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी गोपनीय विभागाच्या बातमीतारा मार्फत मौजे रामोशीवाडी पोस्ट जाखणगाव ता. खटाव येथील टेकवस्तीवर राहणारा आहे इसम अंकुश गणपत मदने हा त्याचे जवळ गावठी पिस्तूल व तलवार घेऊन गावात वावरत आहे अशी माहिती मिळाल्याने एक पोलीस पथक तयार करून रामोशीवाडी एक वस्ती येथे नमूद इसमाचा शोध घेऊन त्याच्या हालचालीवर बारकाईने पाळत ठेवून त्याची पूर्णपणे गोपनीय रित्या चौकशी करून दिनांक 20 10 2023 रोजी रात्री साडेसात ते आठ वाजता सुमारास त्यात सापळा रचून ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून सखोल चौकशी केली एक गावठी कट्टा व तलवार अशी शस्त्र पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनंजय शिंदे यांनी दोन पंचा समक्ष पंचनामा करून ताब्यात घेतले पुसेगाव पोलीस ठाणे येथे भारतीय शस्त्र अधिनियम कलमा अंतर्गत पोलीस हवालदार श्रीनिवास सानप यांनी फिर्याद दाखल दिली आहे सदर अपराधाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री एस. बी .येवले करत आहेत या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख , श्रीमती अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल, पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके .यांनी पुसेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. तर सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक  श्री समीर शेख यांच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत 81 जिवंत काडतुसे जप्त झाली आहेत.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.