निढळ परिसरातील एस टी स्टँड येथे गतिरोधक कधी होणार.१९ वर्षीय युवकाच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांची तीव्र मागणी.
निढळ परिसरातील एस टी स्टँड येथे गतिरोधक कधी होणार.१९ वर्षीय युवकाच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांची तीव्र मागणी.
पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.
सातारा - पंढरपूर महामार्गावरील पुसेगावपासून ते महिमानगड पर्यंतच्या रस्त्यावर निढळ, पांढरवाडी व महिमानगड या ठिकाणी प्रवाशांची सतत वर्दळ असते. या ठिकाणी गतिरोधक नसल्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. काही दिवसांपूर्वी पांढरवाडी (ता. माण) येथील 19 वर्षीय युवक अभिषेक सुनील सूर्यवंशी याचा अपघात झाला. अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये असलेल्या अभिषेकला दवाखान्यातील खर्चासाठी पांढरवाडी, कोळेवाडी, गोडसेवाडी, राजवाडा, खरातवस्ती, बाराबिगा, जाधववाडी, कातळगेवाडी, निढळ येथून लोकवर्गणी गोळा करण्यात आली. या लोकवर्गणीतून त्याच्यावर औषधोपचार सुरु होते पण त्याची शुक्रवारी प्राणज्योत मालवली. अभिषेकच्या जाण्याने संपूर्ण परिसर हळहळला. व येथील ग्रामस्थांनी एस टी स्टँड येथे गतिरोधकची मागणी केले. अजून कुणाचाही बळी जावू नये म्हणून गतिरोधक आवश्यक आहे.
निढळचा बस स्टॉप हा आजूबाजूच्या गावातील नागरिकांसाठी सोईचे ठिकाण म्हणून परिचित आहे. पण दिवसेंदिवस हे ठिकाण अधिकच धोकादायक होत चालले आहे. या ठिकाणी गतिरोधक नसल्याने व निढळच्या शाळेपासूनच्या उतारामुळे वाहने अधिकच वेगाने येतात त्यामुळे खूप मोठा अपघात होतो. निढळ या बस थांब्यावर गतिरोधक हवा, अशी सर्व नागरिकांची मागणी आहे. तशीच काहीशी परिस्थिती पांढरवाडी व महिमानगड या बस स्टॉपची आहे. या दोन्ही ठिकाणी लोकांची खूपच वर्दळ असते. मागील काही महिन्यात या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. या अपघातात निधन पावलेल्या व्यक्ती बहुतांशी पांढरवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील आहेत. यामध्ये विक्रम साहेबराव जाधव (बाराबिगा), द्वारका आनंदराव नामदास (पांढरवाडी), चंद्रकांत खरात (खरातवस्ती) व आता अभिषेक सुर्यवंशी यांचा या अपघातात मृत्यू झालेला आहे. तरी संबंधित विभागाने ही कारवाई करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. वाहनांच्या वेगावर आवर घालायची असेल आणि अपघात टाळायचे असतील तर निढळ हायस्कूल, निढळ एस टी स्टँड, पांढरवाडी एस टी स्टँड, महिमानगड एस टी स्टँड येथे गतिरोधक बसवावे, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने व पांढरवाडी येथील मंगेश सुर्यवंशी यांनी केली आहे.
Comments
Post a Comment