ह.भ.प.नामदेवराव भोसले (डायरी आबा) शिरंबे यांना समाज रत्न पुरस्कार प्रदान.

ह.भ.प.नामदेवराव भोसले (डायरी आबा) शिरंबे यांना समाज रत्न पुरस्कार प्रदान. 
 
 कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.

शिरंबे ता.कोरेगाव येथील अहोरात्र समाजसेवेच्या व्रताची शपथ घेऊन चाललेलं रकमेव सामाजिक कार्यकर्ते व शिरंबे गावचे प्रतिष्ठित प्रेरणा स्थान असलेले वारकरी सांप्रदायतील ह.भ.प.नामदेव बाबुराव भोसले (डायरी आबा)यांना रोखठोक व्हिजन व दैनिक वर्तमानपत्र कोल्हापूर यांनी कर्तृत्ववान व्यक्ती म्हणून समाजरत्न अवार्ड २०२३ या पुरस्काराने गौरविण्यात व सन्मानित करण्यात आले.                  दि.०६/०९/२०२३ बुधवार रोजी छत्रपती शाहू महाराजांच्या पावन नगरीत, महालक्ष्मी अंबामाता  व जोतिबाच्या आशिर्वादाने तसेच प्रमुख पाहुणे यांच्या साक्षीने आज श्री.बनसोडे न्यायाधीश ,श्री.संजय शिंदे अप्पर जिल्हाधिकारी , श्री.सुरेश माडकर मुख्य संपादक रोखठोक, डॉ.सुरेश राठोड कार्यकारी संपादक, डॉ. सुशिल अग्रवाल, निवासी संपादक विविध मान्यवरांच्या  हस्ते कोल्हापूर येथे वितरित करण्यात आला.ही व्यक्ती प्रसिद्धी माध्यामा पासून अलिप्त असते.सतत निस्वार्थी भावनेने समाजसेवा करीत असते .कोणत्याही आशा न धरता निस्वार्थी भावनेने अनेक पीडित, शोषित, वंचित,मयत वारसदार विधवा महिला,अपंग, रखडलेल्या कामासाठी प्राधान्य‌ अशा माध्यमातून वीस वर्षं निस्वार्थी समाजसेवा वृत्त हाती घेतले आहे.त्यांनी आत्ता पर्यंत अध्यक्ष ग्राहक(उपभोक्ता) संरक्षण समिती सातारा जिल्हा, अध्यक्ष महाराष्ट्र पत्रकार संघ कोरेगाव तालुका, अध्यक्ष क्राईम रिपोर्टर कोरेगाव तालुका,मुख्य संघटक माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ कोरेगाव तालुका, सचिव सार्वजनिक मंदिर समिती अखिल भारतीय वारकरी मंडळ कोरेगाव तालुका, सल्लागार शरद मल्टीस्टेट को-आॅप क्रेडिट सोसायटी लि.वाठार स्टेशन, उपाध्यक्ष आनंदराव अडसूळ विकास प्रतिष्ठान शिरंबे, सचिव श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा (सुवर्ण महोत्सवी वर्ष) शिरंबे, व्यसनमुक्त युवक संघ व वारकरी संप्रदाय गुरुवर्य बंडातात्या कराडकर संचलित,मा.अध्यक्ष/कार्याध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी न्याय मंच कोरेगाव तालुका, सचिव मंदिर जिर्णोद्धार समिती शिरंबे, पत्रकार लोकनिर्माण मराठी साप्ताहिक कोरेगाव, संचालक (बिन विरोध) वि.का.सेवा स.सोसायटी शिरंबे,बारा ज्योतिर्लिंगां,चार धाम पारायण सोहळा, केदारेश्वर पायी दिंडी सोहळा पंढरपूर योगदान,अशी अनेक पदे भूषवली आहेत.विविध संस्था मध्ये उल्लेखनीय काम करुन योगदान दिले आहे.वारकरी संप्रदाय संघटना, भारत भ्रमण यात्रा, धार्मिक कार्यक्रमात योगदान व समाजसेवा अहोरात्र चालू असते.या कार्यक्रम वेळी ग्रामस्थतर्फे श्री.महादेव भोसले मा सरपंच व अध्यक्ष पारायण मंडळ शिरंबे,ह.भ.प.सचिन सुतार पोलीस पाटील व उपाध्यक्ष पारायण मंडळ शिरंबे,श्री.यलाप्पा बिराजदार शंभू महादेव भक्त वेलंग,ह.भ.प अधिक गायकवाड,ह.भ.प.सुनिल घोरपडे, विकास भोसले,दिपक फाळके अॅडीटर कोल्हापूर इत्यादी उपस्थित होते.या पुरस्कार प्रदान झाल्याने अनेक स्तरांतून अभिनंदन करण्यात आले.शुभेच्छा देण्यात आल्या.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.