वर्धनगड येथील वर्धनी मातेच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.
वर्धनगड ता. खटाव येथील वर्धनगड किल्ल्यावरील वर्धनी मातेची यात्रा दिनांक 22 रोजी भरत असून या यात्रेनिमित्त मुंबई, पुणे,कोल्हापूर,सोलापूर, बारामती तसेच राज्यातून हजारो भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येतातअश्विन शुद्ध अष्टमीला रविवार दिनांक 22 रोजी वर्धनी मात्रेचा यात्रोस्तव दुपारी एक वाजता पालखीचे किल्ले वर्धनगड गावातून श्री वर्धनी मातेच्या मंदिराकडे प्रस्थान दुपारी 3:30वाजता वर्धनी मातेची आरती व पालखीची गडावर प्रदक्षिणा, सोमवार दिनांक 23 रोजी पहाटे ब्रह्म मुहूर्तावर होम हवन व सकाळी 8:00 वाजता आरती व घट उस्थापना दुपारी 4 वाजता गडावरील आरती व शिमो्लंघन व पालखीचे गावाकडे प्रस्थान करण्यात येणार आहे. 6:30 वाजता गावामध्ये आगमन 7:30 वाजता मानाई मंदिरासमोर शिमोलंगन घेण्यात येणार आहे. रात्री दहा वाजता गावातून पालखीची मिरवणूक घेण्यात येणार असल्याची माहिती राजाराम कारखानिस व किशोर घोरपडे यांनी दिली आहे. या वर्धनी मातेच्या यात्रेनिमित्त गडावरती व गावामध्ये मिठाईची दुकाने, खेळणी , पाळणे व विविध प्रकारचे वस्तूंचे स्टॉल येत असतात सातारा जिल्ह्यातून येणारे हजारो भाविक देवीच्या दर्शनाचा लाभ घेतात रात्र करमणुकीचे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या यात्रेचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वर्धनीमाता पंच कमिटीचे अध्यक्ष राजाराम कारखानीस यांनी केले आहे.
Comments
Post a Comment