भारत माता की जय म्हणून रेवलकरवाडी येथे महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान सुरू.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
रेवलकरवाडी ता .खटाव येथे महात्मा गांधीजी जयंती निमित्त स्वच्छता अभियान या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी भारत माता की जय ,वंदे मातरम या घोषणेने रेवलकरवाडी दुमदुमून गेली आणि ग्रामपंचायत पासून स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली यावेळी शिवसेनेचे माजी सातारा जिल्हा प्रमुख हरिदास जगदाळे ,डोंगराई दूध संघाचे संचालक खाशाबा कदम, माजी उपसरपंच हणमंत कदम, ग्रामपंचायत सदस्य मोहन कदम ,अधिक कदम, व आबासो कापसे ,रवींद्र लोंढे, शामराव उगळे,आबाजी शिंदे, शशिकांत बिटले ,श्रीरंग भूप, तानाजी लोंढे, प्रवीण कदम, प्रवीण यादव, शंकरराव कदम, हरिदास लोंढे, यांच्यासह विविध मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी व राजमुद्रा ग्रुप चे पदाधिकारी सदस्य यांची उपस्थिती होती .यावेळी युवा नेते हरिदास जगदाळे यांनी रामेश्वर डोंगर मध्ये आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने रामेश्वर डोंगर मध्ये विविध प्रकारचे वृक्षारोपण करणार असल्याचा निर्धार केला आहे व गावच्या विविध भागात स्वच्छता मोहीम राबवणार असल्याचे सांगितले.
Comments
Post a Comment